मुंबई : IPL 2023 चा प्रवास आता शेवटच्या टप्प्याकडे सुरु आहे. आता सर्वच टीम्समध्ये खरी लढाई सुरु झालीय. कुठल्याही टीमला आता पराभव परवडणारा नाहीय. चुकांमधून शिकण्याची वेळ आता निघून गेलीय. प्रयोग करण्याचा वेळ सुद्धा निघून गेलीय. आता होणारे सामने करो या मरो मुकाबले आहेत. शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये आयपीएलमध्ये 57 वा सामना खेळला जाणार आहे.
गुजरात टायटन्सची टीम पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर आहे. आजचा सामना जिंकल्यास त्यांचा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित होईल. मुंबई इंडियन्सकडे त्यांचा प्लेऑफ प्रवेशाचा मार्ग रोखण्याची संधी आहे. त्याचवेळी आज जिंकल्यास पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईच स्थान अधिक भक्कम होईल.
पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम कुठल्या स्थानावर?
रोहित शर्माची टीम 12 पॉइंट्ससह चौथ्या स्थानावर आहे. अजून एक पराभव मार्ग कठीण बनवू शकतो. गुजरात आणि मुंबईमध्ये या सीजनमधील दुसरा सामना होणार आहे. सीजनमधील पहिल्या सामन्यात गुजरातची टीम 55 रन्सनी जिंकली होती.
आता मुंबई जास्त धोकादायक
पहिल्या मॅचच्या तुलनेत मुंबईची टीम आता जास्त मजबूत दिसतेय. मुंबई इंडियन्सची टीम सीजनमध्ये आता जास्त खतरनाक बनलीय. मागच्या सामन्यात मुंबईने RCB ला हरवून पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली होती. मुंबईने, बँगलोरने विजयासाठी दिलेलं 200 रन्सच टार्गेट 17 व्या ओव्हरमध्येच गाठलं होतं.
मुंबईची डोकेदुखी काय?
मुंबईची टीम फॉर्ममध्ये परतलीय. पण मुंबईला आपल्या नेट रनरेटवर लक्ष द्यावं लागेल. मुंबईने आपल्या बॅटिंग लाइनअपमध्ये सुद्धा बदल केले. सध्या रोहित शर्माचा फॉर्म मुंबई इंडियन्सची डोकेदुखी बनलाय. मागच्या 4 पैकी 2 सामन्यात तो डकवर आऊट झालाय. त्याने उर्वरित दोन सामन्यात मिळून 10 धावा केल्यात.
गोलंदाजीची चिंता
मुंबई इंडियन्सला गोलंदाजीवर लक्ष देण्याची गरज आहे. कारण सलग 4 सामन्यात प्रतिस्पर्धी टीमने 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. गुजरातचा सुद्धा मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल.
घराबाहेर गुजरातची टीम धोकादायक
गुजरातची टीम सलग दुसऱ्यांदा किताबासाठी दावेदार आहे. या सीजनमध्ये घराबाहेर खेळताना हार्दिक पंड्याने एकही सामना गमावलेला नाही. गुजरातची टीम ज्या 3 मॅचमध्ये हरली, ते तिन्ही सामने गुजरातमध्ये होते.
Dream 11 Prediction
कॅप्टन : शुभमन गिल
उपकर्णधार : सूर्यकुमार यादव
विकेटकीपर : इशान किशन, ऋद्धिमान साहा
फलंदाज : सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शुभमन गिल, डेविड मिलर
ऑलराउंडर्स : कॅमरन ग्रीन, हार्दिक पंड्या
गोलंदाज : पीयूष चावला, राशिद खान, मोहम्मद शमी