मुंबई: नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (MI vs KKR) सामना सुरु आहे. इंडियन प्रीमियर लीगमधला हा 56 वा सामना आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबईच्या गोलंदाजांना कॅप्टनचा हा निर्णय सार्थ ठरवता आला नाही. वेंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे या दोन्ही सलामीवीरांनी पाच षटकातच अर्धशतकी भागीदारी केली. पावरप्लेच्या सहा षटकात केकेआरच्या एक बाद 64 धावा झाल्या होत्या. सलामीवीर वेंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) आज आक्रमक सुरुवात केली. त्याने चौफेर फटकेबाजी केली. मुंबईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. वेंकटेशने डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन आणि रायली मेरेडिथ यांच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. त्याने दणक्यात पुनरागमन केल्याचे संकेत दिले.
कोलकाताला आयपीएलच्या सुरुवातीपासून ज्या स्टार्टची गरज होती, ती स्टार्ट त्याने करुन दिली. त्यामुळे वेंकटेश अय्यरला रोखणं मुंबई इंडियन्ससाठी आवश्यक होतं. मुंबईच्या गोलंदाजांना त्याच्याविरोधात यश मिळत नव्हतं. अशावेळी विकेटकिपर इशान किशनने वेंकटेशला बाद करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तुम्ही म्हणाल इशान विकेटकिपर आहे, मग तो वेंकटेशला बाद कसा करु शकतो, वेंकटेशला बाद करण्यासाठी इशानला गोलंदाजी करण्याची गरज नव्हती. त्याने ते काम आपल्या तोंडानेच केलं.
ishan Kishan whispered something and Venky out pic.twitter.com/fCiuBtvmal
— Vaishnavi Sawant (@VaishnaviS45) May 9, 2022
वेंकटेश अय्यर क्रीझवर असताना इशान किशन त्याच्याजवळ गेला. व त्याला काही बोलला. नेमका दोघांमध्ये काय संवाद झाला ते कळलं नाही. पण इशान किशन त्याचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होता. पण वेंकटेश त्याच्याकडे दुर्लक्ष करत होता. इशान काहीतरी बोलला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर वेंकटेश अय्यरने कुमार कार्तिकेयच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण कव्हर-पॉइंटला उभ्या असलेल्या डॅनियल सॅम्सने त्याचा सहज झेल घेतला. बाद होण्याआधी त्याने 24 चेंडूत 43 धावा केल्या. यात 3 चौकार आणि 4 सिक्स होते. कोलकाताला मोठ्या धावसंख्येपासून रोखण्यासाठी मुंबई इंडियन्सला ही जोडी फोडणं आवश्यक होतं.