आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 12 व्या सामन्यात 2 गुणांसाठी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या हंगामातील तिसरा सामना आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार हार्दिक पंड्या याने फिल्डिंगचा निर्णय घेत गतविजेत्या केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. केकेआरची टीम म्हणजे बॅटिंगची पावर हाऊस आहे. सुनील नारायण, क्विंटन डी कॉक, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, रिंकु सिंह आणि आंद्रे रसेल यासारखे स्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांसमोर या खेळाडूंना मोठी खेळी करण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे.
मुंबई विरुद्ध कोलकाता यांच्यात आतापर्यंत एकूण 34 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबई केकेआरवर वरचढ राहिली आहे. मुंबईने 34 पैकी 23 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर केकेआरने मुंबईवर 11 वेळा मात केली आहे. तसेच उभयसंघात वानखेडे स्टेडियममध्ये 11 सामने झाले आहेत. मुंबईने वानखेडेत 9 वेळा विजय मिळवलाय. तर केकेआरला फक्त दोनदाच पलटणचा धुव्वा उडवता आला आहे.
मुंबईने या सामन्यासाठी 2 बदल केले आहेत. विल जॅक्स याचं कमबॅक झालं आहे. तर अश्वनी कुमार याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. तर केकेआरने एकमेव बदल केला आहे.स्टार ऑलराउंडर सुनील नारायण याचं पुनरागमन झालं आहे.
मुंबईने टॉस जिंकला
Mumbai 📍
💙 🆚 💜
Predict #KKR‘s score in the powerplay ✍️
Updates ▶ https://t.co/iEwchzDRNM#TATAIPL | #MIvKKR | @mipaltan | @KKRiders pic.twitter.com/i35b6W8R9t
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2025
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन, विल जॅक्स (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार आणि विघ्नेश पुथूर.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.