चेन्नई : IPL 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सपेक्षा गौतम गंभीरची जास्त चर्चा झाली. गौतम गंभीर फक्त नावाला LSG चा मेंटॉर आहे. पण त्याचं काम एका कोचसारखं वाटतं. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीसोबत झालेला त्याचा वाद बराच गाजला. LSG चा मेंटॉर असलेल्या गंभीरला वाद घालण्यासाठी फक्त एक कारण पुरेस ठरतं. सर्वांशी वाद घालणारा गंभीर एका खेळाडूला मात्र घाबरतो.
तुमच्या मनात प्रश्न आला असेल, तो खेळाडू कोण? ज्याला गौतम गंभीर इतका घाबरतो. त्या खेळाडूच नाव आहे रोहित शर्मा. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहितला गौतम गंभीर घाबरतो. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन सर्वात जास्त धोकादायक असल्याच गौतम गंभीर म्हणतो. त्याने एका मुलाखतीत हे सांगितलं होतं.
गौतम गंभीर त्यावेळी रोहितबद्दल काय म्हणाला?
गौतम गंभीरने त्या मुलाखतीत रोहित शर्माला मॉर्डन क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाज म्हटलं होतं. रोहित खतरनाक आणि सर्वश्रेष्ठ आहे, हे मान्य करण्यात मला काही अडचण नाही, असं गंभीर त्यावेळी म्हणाला होता. टीमच्या टॉप ऑर्डरमध्ये रोहितसारखा बॅट्समन असेल, तर तुम्ही विजयाची अपेक्षा करु शकता असं गंभीर म्हणाला होता.
आता वास्तव काय?
गंभीर रोहितबद्दल जे बोललेला, त्यात काही चुकीच नाहीय, ते खरं आहे. IPL 2023 च्या सीजनमध्ये मात्र रोहितला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफमध्ये जरुर आहे, पण त्यात रोहितच योगदान फार नाहीय.
LSG लाच पहिला फटका बसेल
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे बाजी केव्हाही पलटू शकते. जो रोहित ग्रुप स्टेजमध्ये फ्लॉप ठरलाय, कोण सांगू शकतं, प्लेऑफमध्ये तो विजयाचा हिरो ठरेल. कारण रोहित शर्मामध्ये ती क्षमता आहे. असं झाल्यास गौतम गंभीरचीच टीम लखनऊ सुपर जायंट्सला पहिला फटका बसेल.
फक्त बॅटनेच नाही, निर्णयाने बाजी पलटण्याची क्षमता
फक्त बॅटनेच नाही, कॅप्टन रोहित शर्मा आपल्या निर्णयाने सुद्धा मॅचची दिशा पलटू शकतो. गौतम गंभीर हे अनेकदा म्हणालाय, रोहित शर्मा बेस्ट कॅप्टन आहे. म्हणजे LSG च्या मेंटॉरला रोहित शर्माची ताकत काय आहे? ते चांगलं माहितीय, त्यामुळेच गंभीरला त्याची भिती वाटते.