मुंबई: जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) एक प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. ते त्याने सिद्ध केलं आहे. मायदेश असो किंवा परदेश जसप्रीत बुमराह नेहमीच गरज असताना, संघाला विकेट मिळवून देतो. जसप्रीत बुमराहचा आयपीएलमधला पहिला विकेट होता (Virat kohli) विराट कोहली. मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळताना त्याने विराट कोहलीला बाद केलं होतं. जसप्रीत बुमराह सुरुवातीपासून मुंबई इंडियन्सचा अविभाज्य भाग राहिला आहे. आज मुंबई इंडियन्सच संघाचा तो आधारस्तंभ आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहला मोठी रक्कम मोजून रिटेन केलं होतं. कुठल्याही खेळपट्टीवर टिच्चून गोलंदाजी करण्याची आणि विकेट मिळवून देण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळेच जसप्रीत बुमराहला भरवशाचं खेळाडू म्हटलं जातं. मुंबई इंडियन्सप्रमाणे बुमराह भारतीय संघाचाही आज अविभाज्य भाग आहे. आज अनेक मॅचेसमध्ये तो उपकर्णधार असतो. भविष्यात कॅप्टनशिपच्या दृष्टीनेही त्याच्याकडे पाहिलं जात आहे.
यंदाचा आयपीएलचा सीजन सुरु झाल्यापासून जसप्रीत बुमराह पूर्ण लयीमध्ये दिसलेला नाही. काही सामन्यांमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. पण काही सामन्यांमध्ये त्याची दिशा भरकटलेली दिसली. आज पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं.
बुमराहने आज चार षटकात 28 धावा देत एक विकेट घेतला. बुमराहला भले आज एकच विकेट मिळाला असेल, पण त्याने घेतलेली विकेट लाजबाव होती. त्याने लियाम लिविंगस्टोनचा मोठा अडसर दूर केला. लियाम लिविंगस्टोन सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. मागच्या दोन सामन्यात त्याने प्रतिस्पर्धी संघाना आपल्या बॅटचा तडाखा दाखवला होता.
Sudden goosebumps #jaspritbumrah #MIvsPBKS #RohitSharma? pic.twitter.com/hfM0hD3Yxv
— Satyasadhan Mudly (@ImSatya5) April 13, 2022
हाच लिविंग्स्टोन आज जसप्रीत बुमराहच्या भन्नाट यॉर्करसमोर निरुत्तर झाला. स्फोटक फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जाणारा लिविंगस्टोन बुमराहच्या भन्नाट यॉर्करवर क्लीन बोल्ड झाला. 15 व्या षटकात विकेट मिळवण्यासाठी रोहितने बुमराहकडे चेंडू सोपवला. त्याने सुद्धा कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.