मुंबई: आयपीएल 2022 मध्ये आज मुंबई इंइियन्सचा पंजाब किंग्स (MI vs PBKS) विरुद्ध सामना होत आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. पहिल्या चारही सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्सने आज पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्याआधी संघात एकमेव बदल केला आहे. रमणदीपच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सचा समावेश केला आहे. मुंबईचे चार सामने झाले असून चारही सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. पंजाब किंग्सने आपल्या संघात एकही बदल केलेला नाही.
मुंबईच्या तुलनेत पंजाब किंग्सचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चार पैकी दोन सामन्यात त्यांचा विजय आणि दोन मॅचमध्ये पराभव झाला आहे. पंजाबची नजर तिसऱ्या विजयावर आहे. गुणतालिकेत पंजाबचा संघ सातव्या तर मुंबई इंडियन्स शेवटच्या स्थानी आहे.
“मी संघातील खेळाडूंना एवढच सांगितलय की, सकारात्मक रहा, हार मानू नका. ही कठीण परिस्थिती आहे. पण आम्हाला मेहनत करायची आणि सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याची गरज आहे” असं रोहितने सांगितलं.
टॉस जिंकल्यानंतर रोहित म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार. आधीसारखाच पीच वाटतोय. आम्ही यावर खेळलो आहोत. वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळेल. लक्ष केंद्रीत ठेवणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे”.
असा आहे मुंबईचा संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, बसिल थम्पी,
अशी आहे पंजाब किंग्सची Playing -11
मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंह