MI vs RCB : सुर्याच्या इनिंगवर कोहलीने वाजवल्या टाळ्या, नेहलने कारवर मारला बॉल, मुंबई-बँगलोर मॅच मूमेंटस

| Updated on: May 10, 2023 | 11:57 AM

MI vs RCB IPL 2023 : नेहल वढेराने प्लेयर ऑफ द टुर्नामेंटच्या कारवर बॉल मारला. विष्णू विनोदने जगलिंग कॅच पकडली. मॅचचे हेच टॉप मोमेंट्स जाणून घेऊया.

MI vs RCB : सुर्याच्या इनिंगवर कोहलीने वाजवल्या टाळ्या, नेहलने कारवर मारला बॉल, मुंबई-बँगलोर मॅच मूमेंटस
Follow us on

मुंबई : आयपीएलमध्ये मंगळवारच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने RCB वर 6 विकेट राखून विजय मिळवला. मुंबईसमोर विजयासाठी 200 धावांच टार्गेट होतं. सूर्यकुमार यादवच्या 83 धावांच्या इनिंगच्या बळावर फक्त 16.3 ओव्हर्समध्ये मुंबईने विजयी लक्ष्य गाठलं. त्याच्या या इनिंगवर माजी कॅप्टन विराट कोहलीने टाळ्या वाजवल्या आणि शाबासकी दिली.

मॅचमध्ये इशान किशनने 102 मीटर लांब सिक्स मारला. बंगळुरुचा विराट कोहली आणि मुंबईच्या रोहित शर्माला अंपायरने नॉटआऊट दिलं होतं. पण DRS मध्ये आऊट दिलं. नेहल वढेराने प्लेयर ऑफ द टुर्नामेंटच्या कारवर बॉल मारला. विष्णू विनोदने जगलिंग कॅच पकडली. मॅचचे हेच टॉप मोमेंट्स जाणून घेऊया.

1. पहिल्या ओव्हरमध्ये DRS वर आऊट झाला कोहली

मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्ये RCB चा स्टार बॅट्समन विराट कोहली आऊट झाला. जेसन बेहरनॉफने ओव्हरमध्ये पाचवा शॉर्ट पीच चेंडू टाकला. विराटने पुढे येऊन शॉट मारला. पण चेंडू मागे गेला. मुंबईने कॅचआऊटच अपील केलं. पण अंपायरने नॉटआऊट ठरवलं.

मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने DRS घेतला. बॉल कोहलीच्या बॅटला स्पर्श करुन विकेटकीपरकडे गेल्याच रिप्लेमध्ये दिसलं. अंपायरने आपला निर्णय बदलला. कोहलीला एक रन्स करुन पॅव्हेलियनमध्ये परताव लागलं.

दुसऱ्याडावात मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा DRS वर आऊट झाला. पाचव्या ओव्हरचा अखेरचा चेंडू वनिंदु हसरंगाने गुड लेंथवर टाकला. रोहितने पुढे येऊन शॉट मारला. पण चेंडू पॅडवर लागला. बँगळुरुने अपील केली. अंपायरने नॉटआऊट दिलं. टीमने DRS घेतला. रिप्लेमध्ये रोहित आऊट दिसला. त्याला पॅव्हेलियनमध्ये परताव लागलं.

2. मॅच पहायला रोहित आणि विराटची पत्नी उपस्थित

विराट कोहली आणि रोहित शर्माची बायको मॅच पहायला उपस्थित होती. अनुष्का शर्मा विराटच्या RCB ला सपोर्ट् करत होती. तेच रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह आपल्या पतीच्या टीमला चियर करत होती. कोहली आणि रोहित दोघांनी बॅटने कमाल दाखवली नाही. विराट एक आणि रोहित 7 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याशिवाय बॉलिवुडचा स्टार शाहीद कपूर आणि अनु मलिक मॅच पहायला उपस्थित होते.

3 विष्णु विनोदने घेतली जगलिंग कॅच

मुंबई इंडियन्सचा 12 वा खेळाडू विष्णू विनोदने जगलिंग कॅच घेतली. कॅमरुन ग्रीनने 15 व्या ओव्हरचा पहिला चेंडू फाफ डु प्लेसिस वाइड लेंथ टाकला. डु प्लेसिसने त्यावर शॉट मारला. चेंडू शॉर्ट फाइन लेगला मुंबईचा सब्स्टिट्यूट फील्डर विष्णु विनोदकडे गेला. दोन-तीनवेळा चेंडू त्याच्या हातातून निसटला पण अखेरीस त्याने कॅच पकडली.

4. कॅमरून ग्रीनने सोडली सोपी कॅच

मुंबई इंडियन्सचा प्लेयर कॅमरुन ग्रीनने दिनेश कार्तिकचा सोपा झेल सोडला. मुंबईचा ख्रिस जॉर्डन गोलंदाजी करत होता. 17 व्या ओव्हरचा चौथा चेंडू त्याने स्लोअरवन टाकला. दिनेश कार्तिकने लॉन्ग ऑनला शॉट मारला. कॅमरुन ग्रीन चेंडूवर गेला. पण त्याला कॅच पकडता आली नाही.

5. ईशान किशन ने 102 मीटर लंबा छक्का लगाया

मुंबई इंडियन्सचा विकेटकीपर ओपनर इशान किशनने 102 मीटर लांब सिक्स मारला. मुंबई इंडियन्सच्या इनिंगमध्ये जोश हेझलवूड बॉलिंग करत होता. चौथ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर इशानने डीप स्क्वेयर लेगला सिक्स मारला. हा सिक्स 102 मीटर लांब होता. मॅचमधील हा सर्वात लांब मारलेला सिक्स होता.

बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या कारवर आदळला बॉल

11 व्या ओव्हरमध्ये वनिंदु हसरंगाच्या चेंडूवर नेहल वढेराने स्लॉग स्वीपमारुन डीप मिड-विकेटच्या दिशेला शानदार सिक्स मारला. बॉल बाऊंड्रीच्या बाहेर उभ्या असलेल्या कारवर जाऊन लागला. त्यामुळे कारच्या हँडलला डेंट आलं. आयपीएलच्या सीजनमध्ये असं दुसऱ्यांदा झालय.