मुंबई : भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या एका दिग्गज फलंदाजाबद्दल विधान केलय. सुनील गावस्कर यांच्या मते, या क्रिकेटपटूचा अंदाज गल्ली क्रिकेटसारखा वाटतो. “सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध ज्या पद्धतीची बॅटिंग केली, ते पाहून तो गल्ली क्रिकेट खेळतोय असं वाटलं” असं विधान सुनील गावस्कर यांनी केलं.
सूर्यकुमार यादवने RCB विरुद्ध 35 चेंडूत 83 धावा फटकावल्या. या दरम्यान त्याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. मोकळेपणाने आपलं कौशल्य दाखवलं. त्याने आपल्या इनिंग दरम्यान सात फोर आणि सहा सिक्स मारले.
फलंदाजी पाहून गल्ली क्रिकेटची आठवण
मुंबईने 200 धावांच टार्गेट 21 चेंडू राखून पार केलं. “सूर्या गोलंदाजांना आपल्या इशाऱ्यावर नाचवत होता. त्याची फलंदाजी पाहून गल्ली क्रिकेटची आठवण आली. सतत अभ्यास आणि कठोर मेहनतीमुळे त्याच्या खेळात सुधारणा झालीय” असं सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले.
नेहल वढेराचा आत्मविश्वास वाढला
“बॅटच्या ग्रीपवर सूर्याचा खाली राहणारा हात मजबूत आहे. त्याचा तो खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करतो. आरसीबी विरुद्ध सूर्याने आधी लॉग ऑन आणि लॉग ऑफला शॉट मारले. त्यानंतर मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. सूर्यकुमार यादवची शानदार बॅटिंग पाहून नॉन स्ट्राइक एन्डवर उभ्या असलेल्या नेहल वढेराचा आत्मविश्वास वाढला” असं सूर्यकुमार म्हणाला. त्याने 34 चेंडूत नाबाद 52 धावा फटकावल्या. हे त्याचं दुसर अर्धशतक आहे. सर्यकुमार आणि वढेराने 140 धावांची भागीदारी करुन मुंबईचा विजय सुनिश्चित केला.
संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला
“जेव्हा तुम्ही सूर्यकुमार यादवसोबत बॅटिंग करता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढवतो. नेहल वढेराच्या इनिंगच वैशिष्ट्य म्हणजे त्याने सूर्यकुमारसारखे शॉट मारण्याचा प्रयत्न केला नाही. त्याची चांगली बाब म्हणजे, त्याने संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला” असं सुनील गावस्कर म्हणाले.