मुंबई : क्रिकेटच्या मैदानात सचिन तेंडुलकरने अनेकदा अचाट कामगिरी करुन दाखवलीय. त्याच्या सन्मानार्थ अनेकांच्या माना त्याच्यासमोर झुकल्या. सचिन दुसऱ्यासाठी सुद्धा असं करताना फार कमीवेळा दिसतो. IPL च्या इतिहासातील 1000 व्या मॅचमध्ये असंच काहीस घडलं. मुंबई इंडियन्ससाठी टिम डेविडने कमालीच प्रदर्शन केलं. सचिन तेंडुलकरने स्वत: मैदानात जाऊन त्याला हात मिळवला व त्याची गळाभेट घेतली.
त्यात तो फोटो सुद्धा आहे
IPL च्या सोशल मीडिया हँडलवरुन मुंबई इंडियन्सच्या विजयाचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. त्यात सचिनने टिम डेविडची गळाभेट घेतल्याचा फोटो आहे. टिम डेविडने काल जी वादळी खेळी केली, त्याला तोड नाही. त्याने 14 चेंडूत नाबाद 45 धावा फटकावल्याय लास्ट ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 3 सिक्स मारुन टीमला विजय मिळवून दिला.
3 चेंडूत पलटली बाजी
टिम डेविडने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 14 चेंडूंचा सामना केला. पण त्याने खरी बाजी पलटली 3 चेंडूत. लास्ट ओव्हरमधील हे तीन चेंडू होते. जेसन होल्डर बॉलिंग करत होता. नेट्समध्ये टिम डेविड जशी प्रॅक्टिस करतो, तसच त्याने तिन्ही चेंडू प्रेक्षक स्टँडमध्ये पाठवले.
‘कॉपी अँड पेस्ट’
मुंबई इंडियन्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टिम डेविडच्या प्रॅक्टिसचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. राजस्थान विरुद्ध टिम डेविडने जसे सिक्स मारले, तसेच सिक्स तो प्रॅक्टिसमध्ये मारताना दिसतोय. म्हणूनच मुंबई इंडियन्सने व्हिडिओला ‘कॉपी अँड पेस्ट’ असं कॅप्शन दिलय.
डेविडने 6 चेंडूंची वाट पाहिली नाही
मॅचच्या लास्ट ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला विजयासाठी 17 धावांची आवश्यकता होती. जेसन होल्डर बॉलिंग करत होता. स्ट्राइकवर टिम डेविड होता. ओव्हर सुरु होण्याआधी सामना कुठल्या दिशेला जाणार, हे माहित नव्हतं. पण टिम डेविडला माहित होतं. त्याला लवकर सामना संपवायचा होता. म्हणून 17 धावा करण्यासाठी डेविडने 6 चेंडूची वाट पाहिली नाही.
जेसन होल्डरच्या ओव्हरच्या पहिल्या 3 चेंडूंवर टिम डेविडने 3 सिक्स मारुन मुंबई इंडियन्सचा विजय सुनिश्चित केला. सचिनने सुद्धा मैदानात उतरुन टिम डेविडच कौतुक केलं.