Akash Madhwal IPL 2023 : चान्सच नाय, एकदम ‘कडक’, मधवालच्या परफेक्ट यॉर्करने बुमराह आठवला Video

| Updated on: May 21, 2023 | 6:25 PM

Akash Madhwal IPL 2023 : : हॅरी ब्रूकला काय करताच आलं नाही, एकदा Video बघा. मुंबई इंडियन्सकडून आकाश मधवालने जबरदस्त बॉलिंग केली. त्याने एकट्याने चार विकेट काढल्या.

Akash Madhwal IPL 2023 : चान्सच नाय, एकदम कडक, मधवालच्या परफेक्ट यॉर्करने बुमराह आठवला Video
Akash Madhwal IPL 2023
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई : ‘करो या मरो’ मॅचमध्ये मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 201 धावांच मोठ लक्ष्य आहे. विवरांत शर्मा 47 चेंडूत 69 धावा आणि मयंक अग्रवाल 46 चेंडूत 83 धावा यांच्या फलंदाजीच्या बळावर सनरायजर्स हैदराबाने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 200 धावा केल्या. हैदराबादच्या ओपनिंग जोडीसमोर मुंबई इंडियन्सचे गोलंदाज आज हतबल ठरले. अपवाद फक्त आकाश मधवालचा. त्याने आज मुंबईकडून जबरदस्त गोलंदाजी केली.

विवरांत आणि मयंक बॅटिंग करत असताना एकवेळ हैदराबाद सहज 220-225 च्या पुढे जाईल असं वाटत होतं. पण त्यांना 200 धावांवरच रोखता आले ते फक्त आकाश मधवालमुळे.

क्लासेन आणि ब्रूक धोकादायक फलंदाज मैदानात होते

मुंबई इंडियन्सच्या या बॉलरने आज जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने 4 ओव्हर्समध्ये 37 धावा देऊन 4 विकेट काढले. विवरांत शर्मा (69), मयंक अग्रवाल (83), हेनरिच क्लासेन (18) आणि हॅरी ब्रूक (0) या महत्वाच्या विकेट मधवालने काढल्या. विवरांत आणि मयंकने आपल काम चोख बजावलं होतं. त्याच्यानंतर क्लासेन आणि ब्रूक हे दोन धोकादायक फलंदाज मैदानात होते.


मधवालची महत्वाची भूमिका

क्लासेनने मागच्याच सामन्यात शतक झळकावलं होतं. या दोन फलंदाजांना रोखणं गरजेच होतं. त्यावेळी आकाश मधवालने महत्वाची भूमिका बजावली. त्याने क्लासेन आणि ब्रूक दोघांना क्लीन बोल्ड केलं. ब्रूकचा विकेट खास होता.


जसप्रीत बुमराह आठवला

मधवालने हॅरी ब्रूकला इतका जबरदस्त चेंडू टाकला की. त्याला काही करताच आलं नाही. परफेक्ट यॉर्कर होता. आकाश मधवालचा हा चेंडू पाहून अनेकांना जसप्रीत बुमराह आठवला. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या सीजनमध्ये खेळत नाहीय. बुमराहकडे परफेक्ट यॉर्कर टाकण्याची क्षमता आहे. आकाश मधवालने हॅरी ब्रूकला तसाच चेंडू टाकून आऊट केलं.

कोण आहे आकाश मधवाल

आकाश मधवाल मूळचा उत्तराखंड रुरकीचा आहे. त्याने 25 T20 सामन्यात 7.66 च्या सरासरीने 25 विकेट घेतल्यात. 10 प्रथम श्रेणी सामन्यात 3.38 च्या सरासरीने 12 विकेट घेतल्यात. 17 लिस्ट ए च्या सामन्यात 18 विकेट घेतल्यात.