मुंबई : मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये आज IPL 2023 मधला 69 वा सामना झाला. सनरायजर्स हैदराबादसाठी फक्त प्रतिष्ठा राखण्यापुरत या सामन्याच महत्व होतं. पण मुंबई इंडियन्ससाठी ही मॅच ‘करो या मरो’ होती. प्लेऑफच आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सला आजची मॅच जिंकावीच लागणार होती. त्यानुसार मुंबई इंडियन्सच्या टीमने आज सरस खेळ दाखवला. सनरायजर्स हैदराबादने विजयासाठी दिलेलं 201 धावांच लक्ष्य मुंबईने 18 व्या ओव्हरमध्ये पार केलं. मुंबईने 12 चेंडू आणि 8 विकेट राखून SRH वर मोठा विजय मिळवला.
कॅमरुन ग्रीनची सेंच्युरी हे मुंबईच्या विजयाच वैशिष्टय ठरलं. त्याने 47 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. यात 8 फोर आणि 8 सिक्स आहेत. कॅप्टन रोहित शर्मा आणि ग्रीनची जोडी आज चांगलीच जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माला आज महत्वाच्या सामन्यात सूर गवसला. त्याने 37 चेंडूत 56 धावा करताना 8 फोर, 1 सिक्स मारला. आता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि गुजरात टायटन्स सामन्यावर लक्ष असणार आहे. त्यावर मुंबई इंडियन्सचा प्लेऑफचा प्रवेश अवलंबून आहे.
मस्ट वीन मॅचमध्ये मुंबईने SRH वर मोठा विजय मिळवला. हैदराबादच 201 धावांच लक्ष्य मुंबईने 12 चेंडू राखून पार केलं. मुंबईने SRH वर 8 विकेटने विजय मिळवला. मुंबईकडून कॅमरुन ग्रीनने 47 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. यात 8 फोर आणि 8 सिक्स आहेत.
16 ओव्हर अखेरीस मुंबईच्या 2 बाद 180 धावा झाल्या आहेत. 24 चेंडूत विजयासाठी 21 धावांची गरज आहे.
15 ओव्हर अखेरीस मुंबईच्या 2 बाद 160 धावा झाल्या आहेत. 30 चेंडूत विजयासाठी 41 धावांची गरज आहे.
मुंबईला दुसरा झटका. कॅप्टन रोहित शर्मा OUT झाला. मयंक दागरच्या बॉलिंगवर नितीश कुमार रेड्डीने कॅच घेतली. 37 चेंडूत 56 धावा करताना रोहितने 8 फोर, 1 सिक्स मारला.
13 ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सच्या 1 बाद 148 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा 36 चेंडूत 56 आणि कॅमरुन ग्रीन 33 चेंडूत 73 धावांवर खेळतोय.
रोहित शर्मा आणि कॅमरुन ग्रीन तुफान बॅटिंग करतोय. 10 ओव्हर्समध्ये मुंबईच्या 1 बाद 114 धावा झाल्या आहेत. कॅमरुन ग्रीन 23 चेंडूत 52 आणि रोहित शर्मा 27 चेंडूत 44 धावांवर खेळतोय. ग्रीनने 4 फोर 5 सिक्स मारले आहेत. रोहितने 6 फोर, 1 सिक्स मारलाय.
9 ओव्हर्समध्ये मुंबईच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. कॅमरुन ग्रीन 22 चेंडूत 52 आणि रोहित शर्मा 24 चेंडूत 35 धावांवर खेळतोय. ग्रीनने 4 फोर 5 सिक्स मारले आहेत. रोहितने 4 फोर, 1 सिक्स मारलाय.
पावरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सच्या 1 बाद 60 धावा झाल्या आहेत. कॅप्टन रोहित शर्मा 16 चेंडूत 16 धावा आणि कॅमरुन ग्रीन 11 चेंडूत 30 धावांवर खेळतोय.
3 ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सच्या 1 बाद 24 धावा झाल्या आहेत. भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगवर इशान किशन 12 चेंडूत 14 रन्सवर आऊट झाला. त्याने 1 फोर, 1 सिक्स मारला. त्याने ब्रूककडे कॅच दिली. आता कॅप्टन रोहित शर्मा आणि कॅमरुन ग्रीनची जोडी मैदानात आहे.
विवरांत शर्मा 47 चेंडूत 69 धावा आणि मयंक अग्रवाल 46 चेंडूत 83 धावा यांच्या फलंदाजीच्या बळावर सनरायजर्स हैदराबाने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 200 धावा केल्या. मुंबई इंडियन्सला विजयासाठी 201 धावांच लक्ष्य दिलं आहे. मुंबईने अखेरच्या ओव्हर्समध्ये थोडी चांगली गोलंदाजी केली. मुंबईकडून आकाश मधवालने 4 ओव्हर्समध्ये 37 धावा देत 4 विकेट घेतल्या.
18 ओव्हर्सचा खेळ पूर्ण. हैदराबादच्या 3 बाद 180 धावा. मयंक अग्रवाल 46 चेंडूत 83 रन्सवर आऊट. ग्लेन फिलिप्स 1 रन्सवर बाद. हेनरिच क्लासेन आणि कॅप्टन एडन माक्ररम मैदानात
16 ओव्हर अखेरीस हैदराबादच्या 1 बाद 168 धावा झाल्या आहेत. मयंक अग्रवाल 82 धावा आणि क्लासेन 8 धावांवर खेळतोय.
अखेर मुंबई इंडियन्सला पहिली विकेट मिळाली आहे. ओपनर विवरांत शर्माला मधवालने रमणदीप सिंहकरवी कॅच आऊट केलं. त्याने 47 चेंडूत 69 धावा केल्या. यात 9 फोर 2 सिक्स आहेत.
मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सचा संघर्ष सुरु आहे. 13 ओव्हरमध्ये हैदराबादच्या बिनबाद 130 धावा झाल्या आहेत. ओपनर विवरांत शर्मा 45 चेंडूत 68 आणि मयंक 33 चेंडूत 53 धावांवर खेळतोय. विवरांतने 9 फोर, 2 सिक्स मारले आहेत. मयंक अग्रवालने 7 फोर, 1 सिक्स मारला आहे.
मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सचा संघर्ष सुरु आहे. 10 ओव्हरमध्ये हैदराबादच्या बिनबाद 93 धावा झाल्या आहेत. ओपनर विवरांत शर्माने 36 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली. यात 7 फोर, 1 सिक्स आहे. मयंक अग्रवाल 24 चेंडूत 35 धावांवर खेळतोय.
पावरप्लेच्या 6 ओव्हर अखेरीस हैदराबादच्या बिनबाद 53 धावा झाल्या आहेत. विवरांत शर्मा 24 चेंडूत (27) आणि मयंक अग्रवाल 12 चेंडूत (21) धावांवर खेळतोय.
5 ओव्हर अखेरीस हैदराबादच्या बिनबाद 43 धावा झाल्या आहेत. विवरांत शर्मा (18) आणि मयंक अग्रवाल (20) धावांवर खेळतोय.
मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद सामन्याला सुरुवात झाली आहे. जेसन बेहरनडॉर्फने पहिली ओव्हर टाकली. हैदराबादच्या बिनबाद 5 धावा झाल्या आहेत. विवरांत शर्मा आणि मयंक अग्रवालची जोडी मैदानात आहे.
मयंक अग्रवाल, विवरांत शर्मा, एडन मार्करम (कॅप्टन), हेनरिक क्लासन, हॅरी ब्रुक, नीतीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंह, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक
रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेविड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल
Our squad for #MIvSRH: ?
1️⃣1️⃣: Rohit (C), Ishan (WK), Cameron, Surya, David, Nehal, Jordan, Chawla, Jason, Kartikeya, Madhwal
? Subs: Ramandeep, Vishnu, Stubbs, Tilak, Warrier#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL
— Mumbai Indians (@mipaltan) May 21, 2023
मुंबई इंडियन्ससाठी आज हैदराबाद विरुद्धचा सामना ‘करो या मरो’ आहे. या मॅचमध्ये मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकला आहे. मुंबईने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हैदराबादची टीम बॅटिंगसाठी मैदानात उतरेल.
आयपीएल 2023 च्या ग्रुप स्टेजचा आज शेवटचा दिवस आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना होणार आहे. प्लेऑफ प्रवेशाची आशा जिवंत ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सला मॅच जिंकावीच लागेल.