मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आजचा मोठा दिवस आहे. कारण, आजचा सामन्यात त्यांना जिंकावंच लागेल. सामना सोडा, नाणेफेक हारणंही महागात पडू शकतं. जर आज नाणेफेक हरली तर ते प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा भंग जवळजवळ पावेल. आज सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध मुंबईला सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकावी लागेल. आणि ती जिंकल्यानंतर फक्त एकच निर्णय, प्रथम फलंदाजीचा. खेळपट्टीचा मूड कसा आहे, हवामान कसे आहे, या सर्व प्रश्नांना मागे टाकत आज त्यांना प्रथम फलंदाजीच निवडायची आणि जास्तीत जास्त धावा करायच्या. धावांचं शिखर कसं बनवता येईल हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे, सनरायझर्स हैद्राबादला मुंबईला 171 धावांच्या फरकानेच पराभूत करावं लागणार आहे. त्यामुळं आता किती धावा बनवाव्या लागतील हा विचार तुम्हीच करा. ( MI vs SRH: Mumbai Indians would be looking to score big and quickly against )
171 धावांचा फरक ठेऊन विजय मिळवला तरच मुंबई इंडियन्सचं नशीब चमकवेल. आणि त्याची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता वाढेल. म्हणूनच आज मुंबई इंडियन्सला त्यांच्या फलंदाजांची जास्त गरज आहे. रोहित शर्माला त्याच्या हिटमॅनचं रुप घ्यावं लागणार आहे. हेच नाही तर मागच्या सामन्यापासून फॉर्ममध्ये आलेल्या इशान किशनलाही नेक्स्ट लेव्हल गाठावी लागेल. आज सूर्यकुमारला हे लक्षात ठेवावे लागेल की जर तो चालला नाही, तर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सूर्य अस्ताकडे जाईल. हार्दिक पांड्यालाही बॅटने तुफानी फलंदाजी करावी लागेल.
4 फलंदाजांच्या तुफानी बॅटिंगची गरज
मुंबई इंडियन्सच्या फक्त 4 फलंदाजांची नावं आम्ही घेत आहोत, कारण, हे चारच फलंदाज असेल आहे, जे आयपीएलमधून बाहेर फेकल्या जाण्याच्या वादळातून मुंबई नाव किनाऱ्यावर पोहचवू शकतात. पण, इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे की, या चारही खेळाडूंचं सनरायजर्स हैद्राबादविरुद्धचं प्रदर्शन खूप काही चांगलं राहिलेलं नाही. त्यांचा स्ट्राईक रेट हैद्राबादविरुद्ध इतकाही चांगला नाही. मात्र, आज जर हे 4 खेळाडू चालले, तर मुंबई हारलेल्या खेळात पुन्हा एकदा एन्ट्री घेऊ शकते.
रोहित, इशान, सूर्यकुमार आणि पंड्या महत्त्वाचे
सगळ्यात आधी मुंबई इंडियन्सचा हिटमॅन आणि कर्णधार रोहित शर्मबद्दल बोलुया. आयपीएल 2018 पासून सलग ऑरेंज आर्मी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सनरायजर्स हैद्राबादविरुद्ध रोहित शर्माचा 106 स्ट्राईक रेट आहे. इशान किशनने हैद्राबादविरुद्ध 100 पेक्षाही कमीच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत, त्याचा स्ट्राईक रेट 95 आहे. सूर्यकुमार यादव त्यातल्या त्यात वरचढ आहे, त्याचा हैदराबादविरुद्धचा स्ट्राईकरेट हा 112 आहे तर हार्दिक पांड्यानेही फक्त 105 च्या स्ट्राई रेटने धावा केल्या आहे. त्यामुळे आजच्या सामन्यांत या सर्वांना जुने रेकॉर्ड विसरुन खेळावं लागले, काहीतरी हटके करावं लागेल, तरच मुंबईचं नशीब पालटू शकतं.
हेही वाचा: