U19 World Cup: मायकल वॉनला दिसला भारताच्या अंडर 19 टीममध्ये असामान्य खेळाडू, म्हणाला….

| Updated on: Feb 03, 2022 | 1:20 PM

अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियमवर येत्या शनिवारी इंग्लंड विरुद्ध अंतिम सामना होणार आहे.

U19 World Cup: मायकल वॉनला दिसला भारताच्या अंडर 19 टीममध्ये असामान्य खेळाडू, म्हणाला....
Follow us on

लंडन: भारताने काल अंडर 19 वर्ल्डकप (ICC under 19 world cup) स्पर्धेच्या उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. कर्णधार यश धुल (Yash Dhull) आणि शेख राशीद भारताच्या विजयाचे हिरो ठरले. यश धुलने दमदार (110) शतकी खेळी केली. त्यामुळेच भारताला 291 धावांपर्यंत मजल मारता आली. यश धुलच्या खेळाने इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनलाही (Michael Vaughan) प्रभावित केलं आहे. अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियमवर येत्या शनिवारी इंग्लंड विरुद्ध अंतिम सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियावर भारताने सहज विजय मिळवल्यानंतर मायकल वॉनने टि्वटरवरुन भारताच्या युवा संघाचं कौतुक केलं. ‘भारतीय क्रिकेटच भविष्य सुरक्षित आहे’ असे वॉनने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

मायकल वॉन भारतावर जास्त टीकाच करतो
मायकल वॉन हा बहुतांश वेळा भारतीय क्रिकेट संघावर टीकाच करत असतो. त्याच्या खिल्ली उडवणाऱ्या टि्वटसचा नेटीझन्स समाचार घेत असतात. वसिम जाफर बरोबरची त्याची टि्वटरवरील जुगलबंदी नेहमीच चर्चेचा विषय असते. पण काल त्याने चक्क भारतीय युवा संघाच कौतुक केलं. “भारताची अंडर 19 संघाची फलंदाजी उच्च दर्जाची वाटली. यश धुल असामान्य खेळाडू असून भारतीय संघाचं भविष्य सुरक्षित दिसत आहे” असं वॉनने आपल्या टि्वटमध्ये लिहिलं आहे.

सलामीवीर अंगक्रिष रघुवंशी (6) आणि हरनूर सिंह (16) यांनी काल निराशा केली. यश आणि राशिद फलंदाजीसाठी मैदानावर आले तेव्हा संघाच्या दोन बाद 37 धावा होत्या. त्यांनी एका कठीण परिस्थितीतून संघाचा डाव सावरला व मोठ्या लक्ष्यापर्यंत टीमला पोहोचवलं. भारताने निर्धारीत 50 षटकात पाच बाद 290 धावा केल्या. यश धुलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यानंतर कोविडची लागण झाली. त्यामुळे पुढच्या दोन सामन्यांना तो मुकला. काल मात्र त्याने कॅप्टन इनिंग्सचा खेळ दाखवला. जबाबदारी ओळखून एका महत्त्वाच्या सामन्यात त्याने शतकी खेळी साकारली.

संबंधित बातम्या:

Shardul Thakur: ‘हो, मी खराखुरा ऑलराऊंडर’, शार्दुल ठाकूरने हार्दिक पंड्या बाबतही केलं वक्तव्य
U19 World Cup: सेमीफायनलमधला भारताच्या विजयाचा हिरो कॅप्टन यश धुलने विराट कोहलीला टाकलं मागे
IND vs WI: कोरोना विस्फोटामुळे टीम इंडियात ‘या’ खेळाडूला मिळाली संधी, 14 महिन्यापूर्वी खेळला होता शेवटची वनडे