मुंबई: राजकीय (Politics) मैदानात विचारधारेमुळे अनेक नेते परस्परांच्या विरोधात भूमिका घेत असतात. पण मैदान बदलल्यानंतर हा विरोध मावळतो. तिथे हे नेते एका गटात दिसतात. खासकरुन क्रिकेटच्या मैदानात भिन्न पक्षाचे नेते एकत्र येत असतात. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackrey) यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचे सर्वपक्षीयांशी चांगले संबंध आहेत. मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव आहेत.
अभिनंद का केलं?
याच मिलिंद नार्वेकरांनी आज जय शाह यांचं अभिनंदन केलं. जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते अमित शाह यांचे सुपूत्र आहेत. आज भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची बिनविरोध निवड झाली. त्याचवेळी सचिव पदावर जय शाह यांची ही बिनविरोध निवड झाली.
Extending my congratulations to @JayShah ji on his reappointment as the @BCCI Secretary. Best wishes for a continued run! pic.twitter.com/XNc4KT64xo
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) October 18, 2022
येत्या 20 ऑक्टोबरला निवडणूक
त्याबद्दल शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी जय शाह यांचं अभिनंदन केलं आहे. आज बीसीसीआयच नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. दोन दिवसांनी 20 ऑक्टोबरला मुंबई क्रिकेट असोशिएशनची निवडणूक होणार आहे. मिलिंद नार्वेकर एमसीए कार्यकारिणी निवडणुकीत शरद पवार-आशिष शेलार गटातून सदस्य पदासाठी उमेदवार आहेत.