मुंबई: भारताच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Mithali Raj Retirement) स्वीकारली आहे. 1999 साली डेब्यु करणाऱ्या मितालीने 23 वर्ष भारताचं प्रतिनिधीत्व केलं. मितालीने महिला क्रिकेटमध्ये (Womens Cricket) अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. भारतीय महिला संघ अडचणीत सापडायचा, तेव्हा मिताली खेळपट्टीवर टीकून रहायची. सहजासहजी प्रतिस्पर्ध्यांना विकेट बहाल केला नाही. एवढ्या मोठ्या करीयरमध्ये अनेक वादही तिच्यासोबत जोडले गेले. एकदा, तर टीम सिलेक्शनवरुन (Team selection) तिने थेट कोचशी वाद घातला होता. मार्च महिन्यात झालेली महिला वर्ल्ड कप स्पर्धा ही मितालीची शेवटची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आहे. क्राइस्टचर्च येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ती शेवटचा सामना खेळली होती. कॅप्टन म्हणून मिताली राजची ही शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती.
मिताली राज सर्वाधिक दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. 23 वर्षाच्या एवढ्या मोठ्या प्रदीर्घ कारकीर्दीत फार कमी वेळा तिचा वादांशी सामना झाला. कोच बरोबर झालेले मतभेद हा सर्वात मोठा वाद आहे. तिने तत्कालिन कोचवर अपमानित केल्याचा आरोप केला होता.
Thank you for all your love & support over the years!
I look forward to my 2nd innings with your blessing and support. pic.twitter.com/OkPUICcU4u— Mithali Raj (@M_Raj03) June 8, 2022
चार वर्षापूर्वी कोच रमेश पोवार यांच्याबरोबर झालेला तिचा वाद मीडियामध्ये बराच गाजला. टी 20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध प्लेइंग 11 मध्ये तिला संघात स्थान दिलं नव्हतं. त्यावरुन वाद झाला होता. स्पर्धेत 2 अर्धशतकं झळकावणाऱ्या मितालीला कोच रमेश पोवार यांनी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात बाहेर बसवलं होतं. वर्ल्ड कपचा तो सेमीफायनलचा सामना होता. भारतीय महिला संघाचा या सामन्यात पराभव झाला होता.