मुंबई: पाकिस्तानची टीम मायदेशात इंग्लंड विरुद्ध T20 सीरीज खेळण्यात व्यस्त आहे. एकूण सात मॅचेसची ही सीरीज आहे. आतापर्यंत चार सामने कराचीमध्ये खेळले गेले आहेत. आता दोन्ही टीम्स लाहोरमध्ये दाखल झाल्या आहेत. 28 सप्टेंबरला सीरीजमधला पाचवा टी 20 सामना खेळला जाईल. पण या मॅचआधी समोर आलेल्या एका मोठ्या व्हिडिओवरुन गदारोळ सुरु आहे.
रिजवान भले मोठा क्रिकेटपटू असेल, पण….
मोहम्मद रिजवानचा हा व्हिडिओ आहे. पाकिस्तानी नागरिकांच रक्त खवळेल असा हा व्हिडिओ आहे. मोहम्मद रिजवान भले मोठा क्रिकेटपटू असेल, पण तो देश आणि राष्ट्रध्वजापेक्षा मोठा असू शकत नाही.
त्यावरुन वाद निर्माण झालाय
या व्हिडिओमध्ये असं काय आहे? ज्यामुळे संतापाचा भडका उडू शकतो. व्हिडिओ सुरु झाल्यानंतर सर्व काही सुरळीत सुरु आहे असं दिसतं. मोहम्मद रिजवान पाकिस्तानचा नावाजलेला क्रिकेटपटू आहे. तो आपल्या चाहत्यांना ऑटोग्राफ देत होता. या व्हिडिओच्या अखेरीस मोहम्मद रिजवानकडून एक कृती झाली. त्यावरुन वाद निर्माण झालाय.
रिजवानने असं करायला नको होतं
व्हिडिओमध्ये मोहम्मद रिजवान कोणाच्या टी-शर्ट, कोणाच्या टोपीवर ऑटोग्राफ देताना दिसतोय. या दरम्यान त्याने काही जणांना पाकिस्तानी झेंड्यावर सुद्धा सही दिली. ऑटोग्राफ देऊन झाल्यावर तिथलं सर्व आटोपताना रिजवान पाकिस्तानी झेंडा पायाने उचलताना व्हिडिओमध्ये दिसतो.
एवढी साधी गोष्ट रिजवानला समजली नाही
राष्ट्रध्वज हा कुठल्याही देशाचा मान, सन्मान असतो. पण एवढी साधी गोष्ट मोहम्मद रिजवानच्या लक्षात आली नाही. आता जाणतेपणी झाल असो किंवा अजाणतेपणी रिजवानला यासाठी माफी मागितली पाहिजे. रिजवानची ही कृती पाहिल्यानंतर नक्कीच पाकिस्तानी जनतेच रक्त खवळू शकतं.