मुंबई: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) त्याचा एक्स्प्रेस वेग आणि घातक स्विंगसाठी ओळखला जातो. आपल्या भेदक गोलंदाजीने मोहम्मद शमी जगातील कुठल्याही फलंदाजाला धक्का देऊ शकतो. शमी आज भारतीय गोलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट (International Cricket) मध्ये सर्व फॉर्मेट मध्ये मिळून मोहम्मद शमीने आतापर्यंत 386 विकेट घेतले आहेत. मोहम्मद शमीच्या तोडीचे आज जगात फार कमी गोलंदाज आहेत. मोहम्मद शमीच्या कुटुंबात एका नवीन सदस्याचं आगमन झालं आहे. हा सदस्य मोहम्मद शमीला वेगाच्या बाबतीत कधीही मात देऊ शकतो. मोहम्मद शमीने जॅग्वार F-टाइप (Jaguar F-type) ही आलिशान कार विकत घेतली आहे. फक्त 3.7 सेकंदात ही कार 0-100 किमी प्रतितास वेग गाठू शकते.
Jaguar F-Type ची एक्स-शोरूम कींमत 98.13 लाख रुपये आहे. मोहम्मद शमीने विकत घेतलेली गाडी Jaguar Land Rover च्या वेगवान कार्सपैकी एक आहे. या स्पोर्ट्स कार मध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. 295 bhp पावर आहे. 400 nm पीक टॉर्क जेनरेट होते.
शिवा मोटर्सचे संचालक अमित गर्ग यांच्यासोबतचा शमीचा फोटो आहे, गर्ग यांनी त्यांच्या लिंकडिनवर शेयर केलाय. या फोटोमध्ये ते शमीकडे कार सुपूर्द करताना दिसतायत. दुसऱ्याबाजूला शमी त्यांना साईन केलेला बॉल देतोय. विराट कोहली, एमएस धोनी हार्दिक पंड्याप्रमाणे मोहम्मद शमीला सुद्धा महागड्या गाडया आणि बाईक्सचा शौक आहे. मोहम्मद शमीच्या ताफ्यात टोयोटा फॉर्च्युनर, BMW 5 सीरीज आणि ऑडी अशा महागड्या गाड्या आहेत. मोहम्मद शमीकडे रॉयल एनफिल्ड GT 650 बुलेट सुद्धा आहे. अलीकडेच शमीने इन्स्टाग्रामवर या बुलेटसोबतचा फोटो पोस्ट केला होता.