मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी (8 सप्टेंबर) टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला. यावेळी 15 मुख्य खेळाडूंसह 3 राखीव खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली. यामध्ये घेण्यात आलेल्या काही खेळाडूंच्या संघात असण्यावर जितकी चर्चा आहे तितकीच काही खेळाडूंना संधी न देण्यात आल्याने देखील आहे. यातीलच दोन खेळाडू हे तर कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) हुकुमी एक्के आहेत. विराटच्या आरसीबी संघातील मुख्य गोलंदाज असणाऱ्या या दोघांनाही टी-20 संघात स्थान मिळालेलं नाही. इतकं सांगितल्यानंतर तुम्हाला कळालचं असेल आम्ही कुणाबद्दल बोलतोय. होय हे दोन खेळाडू म्हणजे अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra chahal) आणि युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj).
टी-20 विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात मुख्य 15 खेळाडूंमध्ये 5 फिरकीपटूंचा समावेश आहे. तर 3 प्रमुख गोलंदाज असून 6 प्रमुख फलंदाजांसह हार्दिक पंड्या चौथा वेगवान गोलंदाज आणि सातवा फलंदाज म्हणून खेळणार आहे. दरम्यान यामध्ये फिरकीपटूंच्या ताफ्यात अनुभवी चहलच्या जागी नवख्या राहुल चाहरला (Rahul Chahar) संधी देण्यात आली आहे. तर तीनच वेगवान गोलंदाज असणाऱ्यांमध्ये अनुभवी दिग्गजांमध्ये सिराज जागा मिळवू शकलेला नाही. आता यामागील कारणं अशी असू शकतात…
संघात युझवेंद्र चहलच्या जागी राहुल चहरला स्थान देण्यात आलं असून यामागे दोघांची अलीकडील आयपीएलमधील कामगिरी हे सर्वात मोठं कारण असू शकतं. आरसीबी संघातील मुख्य फिरकीपटू चहल हा विकेट्स मिळवण्यात यशस्वी ठरतो. पण सोबतच त्याला भरपूर धावा ठोकल्या जातात. त्यातच मुंबई इंडियन्सचा राहुल चहर हा एक मुंबईकडून महत्त्वाच्या क्षणी विकेट तर घेतोच आहे. सोबतच अत्यंत कमी धावा ओव्हरमध्ये देण्यासाठी त्याला ओळखलं जात. दरम्यान या निवडीवर अनेकजण आपलं मत देत असून प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले याने देखील चहलला न घेता राहुल चहरला संधी हे एक मोठं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.
Biggest news is that Ashwin is recalled to the #T20WorldCup team. No other spinner turns the ball away from left handers. No Chahal means a big vote of confidence in Rahul Chahar. Bit hard on Shreyas Iyer
— Harsha Bhogle (@bhogleharsha) September 8, 2021
तर आकाश चोप्राने चहल हा जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंपैकी एक असूनही संघात पाच फिरकीपटूंना संधी देताना त्याला न घेण्यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याने तसं ट्विटही केलं आहे.
Yuzi Chahal has been India’s best T20
spinner for the last few years. And he’s the second best T20 spinner in the world after Rashid Khan. India picks 5 spinners and he isn’t one of them. Let that sink in. #IndianCricketTeam— Wear a Mask. Get Vaccinated, India (@cricketaakash) September 8, 2021
चहलनंतरचा एक धक्कादायक निर्णय म्हणजे युवा गोलंदाज मोहम्मद सिराजला संघात स्थान मिळालेलं नाही. यामागे कारण म्हणजे सामने होत असलेले दुबई, शारजाह आणि अबुधाबीची मैदानं फिरकीपटूंसाठी काही तुलनेत अधिक फायद्याची आहेत. त्यातच आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासात या मैदानात वेगवान गोलंदाजाना खास फायदा झालेला नाही. त्यामुळे अधिक फिरकीपटू घेण्यात आले आहेत. त्यामुळे बुमराह, शमी आणि भुवनेश्वर हे तीनच वेगवान गोलंदाज घेतले असून हे तिघेही सिराजच्या तुलनेत अनुभवी आण दिग्गज असल्याने सिराजचा पत्ता कट झाला आहे.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
राखीव: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर
हे ही वाचा :
T20 world Cup 2021: भारतीय संघात 5 फिरकी गोलंदाज, इतके फिरकीपटू घेण्यामागे ‘हे’ आहे कारण
गब्बरच्या आयुष्यातलं वादळ शमेना, पहिल्यांदा घटस्फोट आता BCCI कडून शिखर धवनला मोठा झटका
(Mohammed siraj and yuzvendra chahal didnt took place in team india for t20 world cup everyone shocks with this decision)