मुंबई: T20 वर्ल्ड कपसाठी सोमवारी टीम इंडियाची घोषणा झाली. 15 खेळाडूंना या टीममध्ये संधी देण्यात आली आहे. या टीममधील काही खेळाडूंच्या निवडीवर चाहत्यांना आक्षेप आहे. या टीममध्ये मोहम्मद सिराजच नाव नाहीय. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलय. मोहम्मद सिराज सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळतोय. तिथे तो आपल्या भन्नाट गोलंदाजीने इंग्लिश काऊंटी टीम्सची वाट लावतोय.
सिराजने किती विकेट घेतल्यात?
त्याची गोलंदाजी खेळणं इंग्लिश फलंदाजांना जमत नाहीय. वारविकशायरकडून खेळताना त्याने सॉमरसेट विरुद्ध पाच विकेट घेतल्या. पाकिस्तान ओपनरला दोन्ही डावात पॅव्हेलियनमध्ये धाडलं.
सिराजने आतापर्यंत 13 टेस्टमध्ये 40 आणि 10 वनेडमध्ये 13 विकेट घेतल्या आहेत. त्याने 5 टी 20 सामन्यात 5 विकेट घेतल्यात. सिराजच्या गोलंदाजीच वैशिष्टय जाणून घेऊया.
कोहलीच ब्रह्मास्त्र म्हटलं जायचं
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना मोहम्मद सिराजची कारकिर्द बहरली. सिराजला कोहलीच ब्रह्मास्त्र म्हटलं जायचं. किंग कोहलीने नेहमीच सिराजचा उत्साह वाढवला. कोहलीने नेहमीच कठीण प्रसंगात सिराजच्या हाती चेंडू सोपवला. कोहलीच्या नेतृत्वाखाली सिराज 8 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. त्यात त्याने 23 विकेट घेतल्या.