IND vs PAK: दिनेश कार्तिकच्या विकेटमध्ये पाकिस्तानी विकेटकीपरने चीटिंग केली का?

| Updated on: Oct 24, 2022 | 1:51 PM

IND vs PAK: : लास्ट ओव्हरमध्ये मोहम्मद रिजवानची चीटिंग अंपायरच्या नजरेतून कशी सुटली?

IND vs PAK: दिनेश कार्तिकच्या विकेटमध्ये पाकिस्तानी विकेटकीपरने चीटिंग केली का?
dinesh-wicket
Image Credit source: twitter
Follow us on

मेलबर्न: टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) काल मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर टी 20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup) सामना झाला. टीम इंडियाने या रंगतदार सामन्यात बाजी मारली. अगदी शेवटच्या चेंडूवर टीम इंडियाने (Team India) विजय मिळवला. हा सामना सुरु असताना क्रिकेट रसिकांनी आपला श्वास रोखून धरला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये अनेक चढ-उतार आले. पण अखेर टीम इंडियाने बाजी मारली.

ही गोष्ट फार कोणाच्या लक्षात आली नाही

या मॅचमध्ये एक नोबॉल देण्यावरुन पाकिस्तानने खूप गहजब केला. पण त्यांनी स्वत: सुद्धा चीटिंग केली अशी चर्चा आहे. अखेरच्या त्या क्षणाच्या धामधुमीत ही गोष्ट फार कोणाच्या लक्षात आली नाही.

लास्ट ओव्हरचा थरार

लास्ट ओव्हरमध्ये टीम इंडियाला विजयासाठी 16 धावांची आवश्यकता होती. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाज गोलंदाज बॉलिंग करणार होता. पहिल्या चेंडूवर हार्दिक पंड्या आऊट झाला. दुसऱ्या बॉलवर दिनेश कार्तिकने एक रन्स काढला. तिसऱ्या चेंडूवर विराटने दोन धावा काढल्या. चौथ्या चेंडूवर विराटने सिक्स मारला. पण हा बॉल कमरेच्या वर असल्याने त्याने नो बॉलची मागणी केली. पंचांनी हा नो बॉल दिला. त्यावर पाकिस्तानी खेळाडूंनी मैदानात अंपायर बरोबर वाद घातला. पण अंपायर आपल्या निर्णयावर ठाम होते.

दिनेश कार्तिक कसा आऊट झाला? ते इथे क्लिक करुन पाहा

चीटिंग कशी केली?

शेवटच्या दोन चेंडूत विजयासाठी 2 धावांची गरज होती. दिनेश कार्तिक स्ट्राइकवर होता. नवाजने लेग स्टंम्पवर बॉल टाकला. कार्तिकच्या शरीराला बॉल लागून मागे गेला. तो क्रीजबाहेर होता. मोहम्मद रिजवानने लगेच स्टम्पिग करुन त्याला आऊट केलं.

त्यानंतरच तो स्टंम्पिग करु शकतो

रिजवानने चेंडू पकडून स्टम्पस उडवले. कार्तिकला अंपायरने आऊट दिलं. रिजवानने बॉल स्टम्पसच्या पुढे पकडलेला. क्रिकेटच्या नियमानुसार, विकेटकीपरने चेंडू स्टम्पसच्या मागे पकडला पाहिजे. त्यानंतरच तो स्टंम्पिग करु शकतो. त्यामुळेच पाकिस्तानने चीटिंग केली अशी चर्चा आहे.

नियम काय सांगतो?

विकेट कीपरने बॉल स्टम्सच्या मागे पकडायचा असतो. पण बॉल जर बॅट्समनला स्पर्श करुन किंवा बॅटला लागून किंवा कुठे लागून मागे पुढे कोणत्याही दिशेला जात असेल, तर विकेटकीपर तो कुठेही पकडू शकतो. त्यामुळे ती चिटिंग नाही.. नियमाला धरुनच आहे.. बॉल दिनेश कार्तिकच्या ग्लोव्हजला लागला होता. त्यानंतर एक टप्पाही पडला मग रिझवान पुढे आला.