पुणे : सध्या महाराष्ट्र प्रीमियर लीगचा सीजन सुरु आहे. MPL 2023 मध्ये महाराष्ट्रातील मुलं कमालीचा खेळ दाखवतायत. औरंगाबाद पैठणच्या अंकित बावनेने तडाखेबंद शतक ठोकलय. अंकित 18 वर्षापेक्षा कमी वयाचा होता, तेव्हा त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 3 सेंच्युरी झळकवल्या होत्या. त्यानंतर त्याचा शतक झळकवण्याचा सिलसिला सुरु झाला. फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए मध्ये मिळून त्याने एकूण 32 शतक झळकावली. पण T20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकही शतक नव्हतं.
17 जूनला 30 वर्षाच्या अंकित बावनेने ही कमतरता भरुन काढली. अंकितने महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील T20 सामन्यात धुवाधार शतक ठोकलं.
कोल्हापूर विरुद्ध रत्नागिरी
महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये अंकित कोल्हापूर टस्कर्सकडून खेळतोय. 17 जूनला कोल्हापूरचा सामना रत्नागिरी जेट्स बरोबर झाला. अंकित बावनेच्या धुवाधार शतकामुळे रत्नागिरी जेट्सचा 4 विकेटने पराभव झाला.
अंकित बावनेने किती चेंडूत झळकवली सेंच्युरी?
अंकित बावनेने फक्त शतक झळकवल नाही, तर त्याने 2 रेकॉर्डही केले. त्याने शतकाची स्क्रिप्ट कशी लिहिली? ते आधी जाणून घ्या. अंकित 98 रन्सवर असताना, त्याने सिक्स मारुन शतक पूर्ण केलं. या शतकासाठी त्याने 59 चेंडू खेळले. या दरम्यान त्याने 11 फोर आणि 4 सिक्स मारले.
शतकाने 2 मोठे कीर्तिमान
अंकितने ज्या चेंडूवर सिक्स मारुन शतक झळकवलं, तो इनिगमधला शेवटचा सिक्स होता. अंकित शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 60 चेंडूत 105 धावा केल्या. या शतकाने त्याने दोन नवीन रेकॉर्ड बनवले. हे त्याचं T20 करियरमधील पहिलं शतक होतं तसच MPL मधील पहिली सेंच्युरी म्हणून नोंद होईल.
Brilliant Bawne smashes maiden 100 of @mpltournament
.
.#MPLonFanCode #AnkeetBawne pic.twitter.com/6W5P29o9b5— FanCode (@FanCode) June 17, 2023
रत्नागिरी जेट्सकडून कोणी फटकेबाजी केली?
या सामन्यात रत्नागिरी जेट्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून 176 धावा केल्या. रत्नागिरीकडून प्रीतम पाटीलने सर्वाधिक 32 चेंडूत 69 धावा फटकावल्या. यात 5 फोर, 6 सिक्स होते. कॅप्टन केदार जाधवसह लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या अंकित बावनेने धुवाधार बॅटिंग केली. त्याने 60 चेंडूत नाबाद 105 धावा फटकावल्या. केदार जाधव फ्लॉप ठरला. त्याने 6 चेंडूत 6 धावा केल्या. कोल्हापूर टस्कर्सने 2 चेंडू राखून विजयी लक्ष्य गाठलं. कोल्हापूरने 6 बाद 181 धावा केल्या.