पुणे : सध्या भारतीय क्रिकेटमध्ये एका नावाची चर्चा आहे, ते म्हणजे Arshin Kulkarni. चर्चा होणं स्वाभाविक आहे, कारण महाराष्ट्राच्या या युवा खेळाडूचा परफॉर्मन्सच तसा आहे. सध्या महाराष्ट्र प्रिमीअर लीग स्पर्धा सुरु आहे. IPL च्या धर्तीवर या टुर्नामेंटच आयोजन करण्यात आलं आहे. MPL 2023 मध्ये अर्शिन कुलकर्णी जबरदस्त प्रदर्शन करतोय. ईगल नाशिक टायटन्सकडून खेळणाऱ्या अर्शिनने आधी छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याने 34 चेंडूत 60 धावा चोपल्या. यात 3 फोर, 5 सिक्स होते.
त्यानंतर पुणेरी बाप्पा विरुद्धच्या सामन्यात अर्शिन कुलकर्णीने 54 चेंडूत 117 धावा फटकावल्या. यात त्याने 3 फोर, 13 सिक्स होते.
पुण्याविरुद्ध ऑलराऊंडर खेळ
पुण्याविरुद्ध अर्शिनने तुफान बॅटिंग केली. त्याने चौफेर फटकेबाजी केली. पुण्याच्या गोलंदाजांचा त्याने चांगलाच समाचार घेतला. अर्शिनला रोखण कठीण दिसत होतं. फक्त बॅटनेच नाही, बॉलने सुद्धा अर्शिनने कमाल केली. पुण्याविरुद्धच अर्शिनने 4 ओव्हरमध्ये 21 धावा देऊन 4 विकेट काढले.
भविष्यातील स्टारची चुणूक
पुण्याविरुद्धच्या सामन्यात अर्शिनने लास्ट ओव्हर टाकली. T20 क्रिकेटमध्ये 5 धावा फार नाहीत, पण अर्शिनने या 5 धावांचा यशस्वी बचाव केला. हा एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. वयाच्या 18 व्या वर्षी महाराष्ट्राच्या युवा क्रिकेटने भविष्यातील स्टारची चुणूक दाखवलीय. अर्शिनच्या रुपाने भारतीय क्रिकेटला एक दमदार ऑलराऊंडर मिळू शकतो.
13 sixes! Arshin Kulkarni was looking to the skies with this century.
.#MPLonFanCode pic.twitter.com/u8BagV5tfW— FanCode (@FanCode) June 20, 2023
MPL च नाही ‘या’ टुर्नामेंटमध्येही चांगलं प्रदर्श
अर्शिन फक्त महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये चमक दाखवतोय असं नाहीय. त्याने महाराष्ट्राकडून खेळताना विनू मंकड ट्रॉफी 2022 मध्ये सर्वाधिक 268 धावा केल्या. यात दोन शतकं होती. कूचबिहार ट्रॉफीमध्ये सुद्धा अर्शिन सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज होता. महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये त्याने आतापर्यंत 3 मॅचमध्ये 195 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत 6.89 च्या इकॉनमीने 5 विकेट घेतल्या आहेत.