मुंबई: यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World cup) टीम इंडिया आपल्या प्रमुख अस्त्राशिवाय उतरणार आहे. ते अस्त्र म्हणजे जसप्रीत बुमराह. (Jasprit Bumrah) बॅक स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे जसप्रीत बुमराहला टी 20 वर्ल्ड कपला मुकाव लागणार आहे. टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया (Team India) जाहीर झाली. त्यात जसप्रीत बुमराहच नाव होतं. पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 सीरीजमध्ये त्याची दुखापत बळावली. अखेर जसप्रीत बुमराहला वर्ल्ड कपमधून बाहेर पडाव लागलं.
जसप्रीत बुमराह वर्ल्ड कपला मुकणार आहे. पण त्याची पत्नी संजना गणेशन मात्र वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. संजना आयसीसीसाठी मुलाखती आणि व्हिडिओ फिचर स्टोरीज कव्हर करते.
कुठले वर्ल्ड कप कव्हर केलेत?
याआधी तिने इंग्लंडमध्ये झालेला आयसीसी वर्ल्ड कप त्यानंतर न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धा कव्हर केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन तिने तिच्या प्रवासाची अपडेट दिली आहे. टी 20 वर्ल्ड कपसाठी रवाना होत असल्याचं तिने म्हटलं आहे.
Heading to what’s quickly becoming my favourite hemisphere ?
.
.#T20WorldCup pic.twitter.com/iazVXUxPpI— Sanjana Ganesan (@SanjanaGanesan) October 7, 2022
चाहत्यांनी काय कमेंट केल्यात?
तिच्या या पोस्टवर बुमराह आणि संजना दोघांच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एका युजरने बुमराहची उणीव जाणवेल असं म्हटलं आहे. एकाने तिला उत्तम कव्हरेजसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका युजरने बुमराहलाही सोबत घेऊन जायच होतसं असं म्हटलं आहे. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन हे सोशल मीडियावर Active असणारं जोडपं आहे. दोघांची पण मोठी फॅन फॉलोइंग आहे.
Bumrah ko v Le jaate ?
— Richesh Samantaray (@RSbababomb) October 7, 2022
बुमराहची जागा कोण घेणार?
जसप्रीत बुमराहला स्ट्रेस फ्रॅक्चरच्या दुखापतीमुळे पुढचे सहा महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाव लागणार असल्याचं म्हटलं जातय. टी 20 वर्ल्ड कपसाठी बुमराहच्या जागी कोणाची निवड करणार? ते अजून जाहीर झालेलं नाही. मोहम्मद शमीच नाव या शर्यतीत आघाडीवर आहे. कारण त्याच्याकडे बुमराह इतका मोठा अनुभव आहे. दीपक चाहरही बुमराहची जागा घेण्यासाठी योग्य पर्याय आहे. कारण तो फलंदाजी सुद्धा करु शकतो.