MS धोनीची झंझावाती इनिंग, लंकेच्या बोलरला फोडून काढलं, 183 धावांच्या अविस्मरणीय खेळीला 16 वर्षे पूर्ण

| Updated on: Oct 31, 2021 | 2:16 PM

T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा सामना आज म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी होणार आहे. टीम इंडियासाठी करो या मरो अशीच असणार आहे. कारण पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारताला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.  पण 16 वर्षांपूर्वी झालेल्या सामन्यातून प्रेरणा घेऊन विराट कोहली आणि टीम इंडिया आजच्या सामन्यात चमत्कार करू शकतात.

MS धोनीची झंझावाती इनिंग, लंकेच्या बोलरला फोडून काढलं, 183 धावांच्या अविस्मरणीय खेळीला 16 वर्षे पूर्ण
ms-dhoni-virat-kohli -shastri
Follow us on

India vs Srilanka : T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा सामना आज म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी होणार आहे. टीम इंडियासाठी करो या मरो अशीच असणार आहे. कारण पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारताला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.  पण 16 वर्षांपूर्वी झालेल्या सामन्यातून प्रेरणा घेऊन विराट कोहली आणि टीम इंडिया आजच्या सामन्यात चमत्कार करू शकतात. 16 वर्षांपूर्वी म्हणजेच 31 ऑक्टोबर 2005 रोजी एका युवा यष्टिरक्षक फलंदाजाच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने विजय मिळवला होता. भारताने 23 चेंडू राखून 300 धावांचे लक्ष्य गाठले होते. 24 वर्षांच्या युवा खेळाडूच्या जोरावर हे शक्य झालं होतं. त्याने 10 षटकार आणि 15 चौकार मारत टीम इंडियाला एकहाती विजय मिळवून दिला. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून महेंद्रसिंग धोनी होता. आणि प्रतिस्पर्धी संघ होता श्रीलंका मैदान होतं, जयपूरचं सवाई मानसिंग स्टेडियम…! 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने धोनीच्या नाबाद 183 धावांच्या जोरावर सहा गडी राखून विजय मिळवला. 183 धावांची खेळी ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकाने खेळलेली सर्वोच्च खेळी आहे. या डावात धोनीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्याने फक्त 25 चेंडूत 120 धावा केल्या.

2005 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात सात एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात होती. भारताने या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली होती. तिसरा सामना जयपूर येथे झाला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली. यष्टिरक्षक-फलंदाज कुमार संगकाराच्या नाबाद 138 आणि महेला जयवर्धनेच्या 71 धावांच्या जोरावर श्रीलंकेने 4 बाद 298 धावा केल्या. शेवटच्या काही षटकांमध्ये परवीझ महारूफने 16 चेंडूत चार चौकार आणि एका षटकारासह नाबाद 33 धावा केल्या. लंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलंच झोडपलं होते.

पहिल्याच ओव्हरमध्ये सचिनची बत्ती गुल

भारतासमोर 299 धावांचे मोठे लक्ष्य होते. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग सलामीला आले. पण पहिल्याच षटकात सचिन चामिंडा वासच्या गोलंदाजीवर विकेटच्या मागे झेलबाद झाला. सचिनने दोन धावा केल्या. सहसा कर्णधार राहुल द्रविड तिसऱ्या क्रमांकावर खेळायचा पण या सामन्यात बदल करण्यात आला. संघ व्यवस्थापनाने युवा खेळाडू महेंद्रसिंग धोनीला वरती खेळायला पाठवले. धोनीने याआधीही वरच्या क्रमांकावर येऊन आश्चर्यकारक कामगिरी केली होती. विशाखापट्टणम वनडेमध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध 148 धावांची खेळी खेळली होती. श्रीलंकेविरुद्धही धोनी वरच्या क्रमाकांवर खेळायला आला. सेहवागच्या (३९) साथीने त्याने दुसऱ्या विकेटसाठी झंझावाती 92 धावा जोडल्या. 15 व्या षटकापर्यंत भारताची धावसंख्या 100 धावांच्या जवळ पोहोचली.

धोनीचा षटकार, भारताचा विजय

त्यानंतर भागीदारी होत राहिली पण त्याचबरोबर विकेटही पडत राहिल्या. मात्र धोनीच्या बॅटमधून धावांचा पाऊस थांबला नाही. त्याने 40 चेंडूंमध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर 85 चेंडूत 10 चौकार आणि पाच षटकारांसह कारकिर्दीतील दुसरे वनडे शतक ठोकले. त्याने भारतीय डावाच्या 25 व्या षटकात शतक पूर्ण केले. त्यानंतर 47 व्या षटकात दिलशानचा चेंडू मैदानाबाहेर भिरकावून भारताला सनसनाटी विजय मिळवून दिला.

(Ms dhoni 183 runs on this day India vs Sri Lanka Jaipur ODI)

हे ही वाचा :

Video | न्यूझीलंडच्या सामन्याआधी टीम इंडियाचे खेळाडू मस्तीत दंग, इशान-ठाकूरचा डान्स, पंतकडून दिवाळी गिफ्ट

T20 World Cup मध्ये 6 चेंडूत 4 षटकार ठोकून सामना जिंकणाऱ्या खेळाडूचा ट्विटरवर सवाल, ‘अजून काही आदेश?’