नवी दिल्ली : वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये शेवटची म्हणजे 10 वी टीम कुठली? त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. नेदरलँड्सच्या टीमला भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच तिकीट मिळालं आहे. आधी श्रीलंका त्यानंतर नेदरलँड्सच्या टीमने वर्ल्ड कप क्वालिफायरमधून प्रवेश केला आहे. नेदरलँड्सने स्कॉटलंडच्या टीमला हरवून हे स्थान मिळवलं. नेदरलँड्सची टीम पाचव्यांदा वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे. या यशात नेदरलँड्सच्या संपूर्ण टीमने योगदान दिलं. पण याच टीममधील एक खास खेळाडू त्याचं एमएस धोनीशी सुद्धा कनेक्शन आहे.
धोनीशी खास कनेक्शन असलेल्या खेळाडूच नाव विक्रमजीत सिंह आहे. विक्रमजीत भारतीय वंशाचा आहे. त्याचा जन्म भारतात पंजाबमध्ये झाला. धोनीशी खास कनेक्शन असण्यामागे हेच कारण आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकीचा विचार करताय.
कनेक्शनच कारण काय?
विक्रमजीतच धोनीशी जे कनेक्शन आहे, त्यामागे जर्सी आहे. दोघांचा जर्सी नंबर सारखाच म्हणजे 7 आहे. आयसीसीने अलीकडेच विक्रमजीतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात त्याने आपल्या जर्सीबद्दल बोलताना धोनीशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला.
विक्रमजीतचा पसंतीचा नंबर कुठला?
7 नंबरच्या जर्सीवरुन मला सोशल मीडियावर भरपूर कमेंट येतात. 7 नंबरची जर्सी धोनीची असल्याच लोक सांगतात. खरं सांगायच झाल्यास, माझा पसंतीचा जर्सी नंबर 10 आहे. पण तो नंबर दुसऱ्या खेळाडूला मिळाल्यानंतर मला 7 नंबरची जर्सी मिळाली.
313 धावा ठोकल्या
विक्रमजीत सिंह नेदरलँड्ससाठी ओपनिंग करतो. वनडे वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये तो नेदरलँड्सकडून ओपनिंगला यायचा. त्याने 7 सामन्यात 313 धावा केल्या. यात 1 सेंच्युरी आहे. ओमान विरुद्ध त्याने हे शतक ठोकलं. यात 110 धावा केल्या.
धोनीचा जर्सी नंबर 7 का आहे?
आता प्रश्न हा आहे की, धोनीचा जर्सी नंबर 7 का आहे? याचा संबंध त्याच्या जन्म तारखेशी आहे. त्याचा जन्म दिवस 7 तारखेला आणि महिना सुद्धा 7 वा येतो. याच कारणामुळे धोनीचा जर्सी नंबर 7 आहे.