मुंबई: एमएस धोनी (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (Cricket) निवृत्त झालाय. पण त्याची फॅन फॉलोइंग आणि जलवा अजूनही टिकून आहे. माहीवर आजही लोक तितकचं प्रेम करतात. धोनी दिसल्यानंतर त्याची सही घेण्यासाठी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी एकच झुंबड उडते. लंडनच्या रस्त्यावर सुद्धा हेच दृश्य पहायला मिळालं. भारताला दोन वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद मिळवून देणाऱ्या धोनीसोबत फोटो काढण्यासाठी एकच गर्दी झाली होती. धोनीला रस्त्यावर चालणं देखील मुश्किल झालं होतं. धोनी सोबत सेल्फी (Selfie) काढण्यासाठी फॅन्स मध्ये एकच झुंबड उडाली होती. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहूनच धोनी सोबत सेल्फी काढण्यासाठी कशी धावपळ सुरु होती, ते तुमच्या लक्षात येईल. धोनीला पाहून लोकांनी आपल्या गाड्या थांबवल्या. काहींनी गाडीतूनच फोटो काढायला सुरुवात केली. काही जण गाडीतून उतरुन फोटो काढण्यासाठी धावले.
सुरक्षारक्षकांनी मोठ्या मेहनतीने धोनीला त्यातून बाहेर काढून गाडी पर्यंत नेऊन सोडलं. लंडनच्या ओव्हल स्टेडियम बाहेरचा हा व्हिडियो असल्याचं म्हटलं जात आहे. भारत आणि इंग्लंड मधील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इथे खेळला गेला होता. भारताने ही मॅच जिंकली होती.
MS Dhoni in the streets of London ❤️?#MSDhoni pic.twitter.com/FWPu0sMBpJ
— Chakri Dhoni (@ChakriDhoni17) July 15, 2022
मागच्या दोन आठवड्यांपासून एमएस धोनी लंडनमध्ये आहे. या महिन्यात चार जुलैला त्याने लग्नाचा वाढदिवस इथेच साजरा केला. धोनी आपल्या कुटुंबासोबत इथे सुट्टीचा आनंद घेतोय. 7 जुलैला आपला 41 वा वाढदिवस सुद्धा त्याने इथेच साजरा केला.