चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील काल एक इमोशनल फोटो समोर आला. महान खेळाडू सुनील गावस्कर एखाद्या सामन्या फॅन प्रमाणे ऑटोग्राफ घेण्यासाठी एमएस धोनीच्या मागे पळत होते. चेपॉक स्टेडियमवर 16 व्या सीजनमधील चेन्नई सुपर किंग्सचा शेवटचा सामना झाला. सीएसके विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स असा हा सामना झाला. धोनीची टीम भले ही मॅच हरली, पण आपल्या फॅन्सचे आभार मानण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सच्या टीमने संपूर्ण मैदानाला फेरी मारली. त्याचवेळी गावस्कर पाठीमागून आले. भारतीय क्रिकेटमधील दोन महान खेळाडूंची ही भेट होती.
सीनियर सुनील गावस्कर यांना ऑटोग्राफ देणं हा धोनी यांच्यासाठी सुद्धा अभिमानाचा क्षण होता. लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या शर्टवर धोनी ऑटोग्राफ देत होता, त्यावेळी संपूर्ण स्टेडियम चियर करत होता. कॉमेंट्री करणारे गावस्कर मॅचनंतर शो साठी पोहोचले. त्यावेळी टीव्ही समोर काही मिनिट आधी झालेल्या घटनेचा टीव्हीसमोर उल्लेख केला.
गावस्करांनी कॅमेरामनला झूम करायला का सांगितलं?
पोस्ट मॅच शो दरम्यान सुनील गावस्कर यांनी कॅमेरामनला आपल शर्ट झूम करण्यासाठी सांगितलं. कारण त्यांना माहीची ऑटोग्राफ दाखवायची होती. गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले की, “धोनीवर कोण प्रेम करत नाही? त्याने इतकी वर्ष भारतीय क्रिकेटसाठी जे केलय ते अद्भूत आहे. महत्वाच म्हणजे तो रोल मॉडेल होता. अनेक युवा क्रिकेटपटू त्याला पाहतात. मला जेव्हा समजलं, धोनी संपूर्ण टीम सोबत मैदानाला फेरी मारणार आहे, त्यावेळी कोणाकडून तरी मी पेन उधारीवर घेऊन गपचूप माझ्याजवळ ठेवलं”
चेपॉकवर फॅन्सचे असे मानले आभार
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 चे आपले 7 सामने चेन्नईमध्ये खेळले. त्यावेळी घरच्या मैदानात खेळताना प्रेक्षकांकडून त्यांना मोठा सपोर्ट मिळाला. धोनी रॅकेटमधून टेनिस चेंडू प्रेक्षकांमध्ये मारले. या मॅचमध्ये केकेआरने चेन्नईचा सहा विकेटने पराभव केला.