मुंबई: चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) 200 सामने खेळणारा एमएस धोनी (MS Dhoni) पहिला क्रिकेटपटू बनला आहे. आयपीएलमधला (IPL) धोनीचा 230 वा सामना आहे. मधली दोन वर्ष 2016 आणि 2017 साली चेन्नई सुपर किंग्सचा संघ निलंबित होता. त्यावेळी धोनी 30 सामने रायजिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून खेळला होता. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कॅप्टन फाफ डू प्लेसिस बरोबर धोनी टॉस उडवण्यासाठी मैदानात गेला. त्यावेळी CSK साठी 200 सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदला गेला. आरसीबी विरुद्ध सर्वाधिक धावा धोनीच्या खात्यात जमा आहेत. एमएस धोनी शिवाय फक्त विराट कोहली RCB साठी 200 सामने खेळला आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं विराटने 218 सामन्यात प्रतिनिधीत्व केलं आहे. 2008 पासून विराट आरसीबीसाठी खेळतोय.
दुसरा कुठलाही फलंदाज धोनीच्य आसपास नाहीय, जो चेन्नईसाठी इतके सामने खेळलाय. मेगा ऑक्शनमध्ये सुरेश रैनाला कोणीही विकत घेतलं नाही. तो चेन्नई सुपर किंग्ससाठी 176 सामने खेळलाय. रवींद्र जाडेजाने मागच्या आठवड्यात सीएसकेचं नेतृत्व सोडलं. त्याने आतापर्यंत या फ्रेंचायजीसाठी 142 सामने खेळले आहेत.
From the first time in 2008 to becoming a household emotion?! Here’s to a lot more in Yellove!?#WhistlePodu #Yellove ? pic.twitter.com/ZJKvGOXGdo
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 4, 2022
धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने चार वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने सर्वप्रथम 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये विजेतेपद मिळवलं आहे. आयपीएल 2022 सुरु होण्याच्या दोन दिवस आधी सीएसकेने रवींद्र जाडेजाच्या नावाची कॅप्टन म्हणून घोषणा केली. पण रवींद्र जाडेजाला कॅप्टनशिपची जबाबदारी पेलवली नाही. त्याने सीजनच्या मध्यावरच कॅप्टनशिप सोडली व पुन्हा धोनीकडे नेतृत्व सोपवलं. धोनीने नेतृत्वाची धुरा संभाळल्यानंतर मागच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध विजय मिळवला.