PHOTO: आरसीबीविरुद्ध तळपते धोनीची बॅट, असा आहे आतापर्यंतचा रेकॉर्ड
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याचे चाहते अजिबात कमी झालेले नाहीत. दरम्यान सध्या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या धोनीकडून आज मोठ्या स्कोरची अपेक्षा केली जात आहे.
1 / 5
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारल असणाऱ्या महेद्र सिंह धोनीने (MS Dhoni) 15 ऑगस्ट, 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सध्या तो आयपीएलमध्ये केवळ खेळत आहे. पण आयपीएलमध्येही त्याला मोठा स्कोर उभा करता आलेला नाही. दरम्यान आज हा दुष्काळ संपवून धोनी एक मोठा स्कोर करु शकतोय याचे कारण आज सीएसकेचा सामना असणारा संघ आरसीबी विरुद्ध धोनीचा आतापर्यंतचा रेकॉर्ड दमदार आहे.
2 / 5
आरसीबीविरुद्ध धोनीने चार अर्धशतकं ठोकली आहेत. यामध्ये नाबाद 84 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. विशेष म्हणजे धोनीने आऱसीबीविरुद्ध 50 चौकार आणि 46 षटकार ठोकले आहेत.
3 / 5
आरसीबीविरुद्ध कायमच धोनीने शानदार प्रदर्शन केलं आहे. धोनीने आरसीबीविरुद्ध 28 सामन्यात फलंदाजी करताना 41.25 च्या सरासरीने 825 धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 141.50 इतका होता.
4 / 5
याशिवाय माही आरसीबीविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही दुसऱ्या क्रमांकावर आहे. हैद्राबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आरसीबीविरुद्ध सर्वाधिक 877 रन केल्या असून त्याच्यानंतर धोनीचा नंबर लागतो. पण यंदाच्या पर्वात धोनीने आरसीबीविरुद्द केवळ दोनच रन केले आहेत.
5 / 5
संपूर्ण आयपीएलचा विचार करता धोनीने आतापर्यंत 212 सामन्यात 39.93 च्या सरासरीने 4 हजार 672 रन केले आहेत. ज्यामध्ये 23 अर्धशतकांचा समावेश आहे.