चेन्नई : केकेआरने सीएसकेला 6 विकेटने हरवलं. मॅचमध्ये केकेआरचा रिंकू सिंह कमालीची इनिंग खेळला. तो 54 रन्सवर आऊट झाला. रिंकूने कॅप्टन नितीश राणासोबत मिळून 99 रन्सची पार्ट्नरशिप केली. याच पार्ट्नरशिपमुळे मॅच फिरली. रिंकूने त्याच्या अर्धशतकी खेळीने मन जिंकलं. त्याचवेळी केकेआरच्या फिनिशरने असं काही केलं की, त्याची चर्चा होतेय.
मॅच संपताच रिंकू सिंह सीएसकेचा कॅप्टन धोनीजवळ गेला व टी-शर्टवर त्याचा ऑटोग्राफ घेतला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. फॅन्सनी धोनी आणि रिंकूला एकत्रित पाहून आनंद व्यक्त केला. फॅन्स रिंकू सिंहला भारतीय क्रिकेटमधील नवीन फिनिशर समजत आहेत. अशावेळी रिंकूला धोनीसोबत पाहून फॅन्सचा आनंद गगनात मावत नव्हता.
हीच मॅच विनिंग पार्ट्नरशिप
सीएसके विरुद्धच्या मॅचमध्ये रिंकू सिंह 54 रन्सची इनिंग खेळला. त्याने आपल्या इनिंगमध्ये 43 चेंडूंचा सामना केला. यात 4 फोर आणि 3 सिक्स आहेत. कॅप्टन नितीश राणाने 57 धावा केल्या. दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. हीच मॅच विनिंग पार्ट्नरशिप ठरली.
#RinkuSingh gets an autograph from Thala, #MSDhoni? ??
| @rinkusingh235 @msdhoni |#KKRvCSKpic.twitter.com/EgM889kPVE
— Namma SRK Fan (@priteshpdedhia) May 14, 2023
Signing off for the night in style! ?? pic.twitter.com/XpWE1ZGYBs
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 14, 2023
प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार
एकवेळ केकेआरचे 33 रन्सवर 3 विकेट गेले होते. राणाने रिंकूसोबत मिळून टीमला विजयाच्या समीप पोहोचवलं. रिंकूला त्याच्या इनिंगसाठी प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.