दुबई : कोरोनाच्या संकटामुळे उर्वरीत आयपीएल (IPL 2021) ही युएई (UAE) होणार आहे. 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलसाठी सर्व संघ हळू हळू युएईला पोहोचत आहेत. सर्वात आधी चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) संघ 13 ऑगस्ट रोजी युएईला पोहचला असून मुंबईचे काही खेळाडू देखील युएईक पोहोचले आहेत. दोन्ही संघाचा विलगीकरणाचा कालावधी संपला असून आता दोन्ही संघांनी सरावाला सुरुवात केली आहे. सरावादरम्यान मजा मस्ती करत क्रिकेटसह इतरही खेळ दोन्ही संघ खेळत आहेत.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याच्यासह सर्व खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणाचा सराव सुरु केला आहे. दरम्यान व्यायाम म्हणून तसेच काही वेगळं म्हणून चेन्नईच्या खेळाडूंनी सरावादरम्यान थेट फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या ट्विटर हँडलवरुन 3-4 फोटो टाकले आहेत. ज्यामध्ये एमएस धोनी आणि त्याचे साथीदार फुटबॉल खेळताना दिसत आहेत.
Kick-starting the day ⚽#WhistlePodu #Yellove ??@msdhoni @ImRaina @sharmakarn03 @robbieuthappa pic.twitter.com/T9o6CakFOQ
— Chennai Super Kings – Mask P?du Whistle P?du! (@ChennaiIPL) August 21, 2021
दुसरीकडे अबुदाबीमध्ये असणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने पाण्यामध्ये उतरत वॉलीबॉल खेळाचा आनंद लुटला. मुंबई इंडियन्सनेही त्यांच्या सोशल मीडियावर हा वॉलीबॉल खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये इशान किशन, पीयूष चावला, आदित्य तारेसह धवन कुलकर्णी आणि इतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू दिसून येत आहेत. आयपीएल 2021 च्या उर्वरीत 31 सामन्यांमध्ये पहिलाच सामना मुंबई विरुद्ध चेन्नई असल्याने क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
इतर बातम्या
तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद
Video: उडे जब जब झुल्फें तेरी, पोरींचा घोळका झूम मिटींगवरच नीरज चोप्रासमोर नाचायला लागला
VIDEO : कॅप्टन कूल धोनी बनला रॉकस्टार, उर्वरीत IPL ची दणकेबाज घोषणा, म्हणतो ‘पिक्चर अभी बाकी है’
(MS dhonis csk team playing football and mumbai indians players enjoying volleyball at pool see video)