दुबई : उर्वरीत आयपीएलसाठी (IPL 2021) सर्व संघ सज्ज झाले आहेत. बहुतेक संघ युएईला (UAE) पोहोचले असून सरावाला अनेकांनी सुरुवात केली आहे. तर काही संघ सध्या विलगीकरणात आहेत. दरम्यान सराव सुरु असलेल्या संघापैकी अनेक संघ विविध प्रकारचे खेळ खेळून स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये चेन्नई सुपरकिंग्स (CSK), मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) या संघाचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईचे खेळाडू पाण्यात वॉलीबॉल खेळत असतानाचा व्हिडीओ समोर आला होता. आता चेन्नई आणि दिल्लीचे खेळाडू फुटबॉल खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
सध्या दुबईमध्ये असणारा चेन्नईचा संघ आपआपसांत सराव म्हणून फुटबॉलच्या मॅचेस खेळत आहे. या सामन्यात सर्व खेळाडू खेळत असले तरी सर्वात चांगला खेळ संघाचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार धोनीचाच दिसून येत आहे. धोनीने एका व्हिडीओमध्ये मारलेला उत्कृष्ट हेडर तर सर्वांचीच मनं जिंकत आहे. धोनीचं फुटबॉल प्रेम कायमच दिसून येतं. मुंबईतही तो ऑल स्टार्स एफसीकडून चॅरीटी मॅचेसमध्ये खेळताना दिसला आहे.
दुसरीकडे नुकताच विलगीकरणाचा कालावधी संपवून सरावसाठी मैदानात उतरलेले दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडूही फुटबॉल खेळताना दिसून आले. यावेळी श्रेयस अय्यर, कागिसो रबाडा यांसारखे खेळाडू फुटबॉलने अप्रतिम किक मारत असल्याचा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
In a parallel universe, which of our DC stars do you think could excel professionally in sports other than cricket? ??#NationalSportsDay #YehHaiNayiDilli pic.twitter.com/pgvSTegadX
— Delhi Capitals (@DelhiCapitals) August 29, 2021
श्रेयस अय्यर दुखापतीमुळे क्रिकेट मैदानापासून दूर होता. त्यामुळे IPL 2021 च्या आधीच्या पर्वात तो खेळू शकला नव्हता. पण आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. सध्या तो युएईमध्ये संघासोबत कसून सरावही करत आहे. दरम्यान अय्यर नसताना दिल्लीचं कर्णधारपद ऋषभ पंतला सोपवण्यात आलं होतं. दिल्लीने पंतच्या नेतृत्त्वाखाली उत्तम कामगिरी देखील केली. त्यामुळे आता दुसऱ्या पर्वात पंतलाच कर्णधार ठेवणार की पुन्हा अय्यरला कर्णधारपद सोपवणार हे पाहावं लागेल.
इतर बातम्या
IPL 2021: आरसीबीचा संघ कर्णधार विराट शिवाय युएईला रवाना, संघामध्ये काही महत्त्वाचे बदल
तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद
VIDEO : कॅप्टन कूल धोनी बनला रॉकस्टार, उर्वरीत IPL ची दणकेबाज घोषणा, म्हणतो ‘पिक्चर अभी बाकी है’
(MS dhonis csk team playing football and Shryeas iyers delhi capitals enjoying Football)