मुंबई: भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा सध्या बांग्लादेश विरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यावर आहेत. त्याचवेळी भारतात रणजी ट्रॉफी आणि अजून एक देशांतर्गत स्पर्धा सुरु आहे. कदाचित त्यावर कोणाच लक्ष असेल. देशांतर्गत महिला अंडर-19 वनडे ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत एका खेळाडूने जबरदस्त बॅटिंग केली, त्याची चर्चा सुरु आहे. या खेळाडूच नाव आहे सानिका चाळके. सानिकाने बुधवारी सिक्कीविरुद्ध डबल सेंच्युरी झळकवली.
विशाल लक्ष्य उभारलं
डबल सेंच्युरी झळकवण क्रिकेटमध्ये सोपं नसतं. फार कमी लोकांना अशी कामगिरी जमते. पण सानिकाने तुफानी बॅटिंग करुन हे शक्य केलं. सानिकाच्या इनिंगच्या बळावर मुंबईने 4 विकेट गमावून 455 धावांच विशाल स्कोर उभा केला. प्रतिस्पर्धी सिक्कीमची टीम अवघ्या 49 रन्समध्ये ऑलआऊट झाली.
चौथ्या क्रमांकावर येऊन घातला धुमाकूळ
मुंबईची टीम पहिली बॅटिंग करत होती. सानिका मैदानात आली, तेव्हा मुंबईच्या टीमने दोन विकेट गमावले होते. 66 धावांवर सलोनी कुश्ते आणि 87 धावांवर एलिना मुला आऊट झाली. दोघींनी अनुक्रमे 31 आणि 32 धावा केल्या. कॅप्टन तुशी शाह 15 रन्सवर आऊट झाली. मेहक पोकार 37 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतली. सानिका आणि शार्वी सावेने 269 धावा्ची भागीदारी केली. सानिकाने 117 चेंडूंचा सामना करताना नाबाद 200 धावा फटकावल्या. आपल्या इनिंगमध्ये तिने 24 चौकार आणि 3 षटकार मारले. सावे 111 धावांवर नाबाद राहिली. तिने 79 चेंडूंचा सामना केला. तिने 12 चौकार आणि 2 षटकार लगावले.
स्मृती मांधनाच्या पंक्तीत स्थान
सानिकाने आपलं नाव एका खास यादीत समाविष्ट केलय. स्मृती मांधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि राधवी बिष्ट यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याची कामगिरी केलीय.
Our Mumbai Under-19 Women’s team has qualified for the knockouts of the U-19 One Day Trophy ?
Drop a ? and show your support to our girls ?#MCA #Mumbai #Cricket #IndianCricket #Wankhede #BCCI pic.twitter.com/SkqL4G28js
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) December 14, 2022
सिक्कीमकडून सर्वाधिक धावा 9
456 धावांच्या डोंगरासमोर सिक्कीच्या टीमच्या विजयाची शक्यता कमी होती. पण सिक्कीची टीम बऱ्यापैकी धावा करेल, अशी अपेक्षा होती. पण या टीमचे 11 खेळाडू मिळून सुद्धा अर्धशतकी मजल मारु शकले नाहीत. टीमचा कुठलाही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. टीमसाठी सर्वाधिक 9 धावा लीजाने केल्या.