IPL 2021: मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैद्राबाद (MI vs SRH) या संघात सुरु असलेल्या सामन्यात प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबई शर्थीचे प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना सलामीवीर इशानच्या मेहनतीची जोड मिळाली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सकडून इशान किशनने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावत मुंबईला जबरदस्त सुरुवात करु दिली आहे. इशानने मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं आहे.
Man on a mission, Mr. @ishankishan51! ? ?
A 16-ball half-century for the @mipaltan left-hander. ? ? #VIVOIPL #SRHvMI
Follow the match ? https://t.co/STgnXhy0Wd pic.twitter.com/muvfkGd8mF
— IndianPremierLeague (@IPL) October 8, 2021
मुंबई इंडियन्ससाठीआजचा मोठा दिवस आहे. कारण, आजच्या सामन्यात त्यांना सनरायझर्स हैद्राबादला नमवणं केवळ लक्ष्य नसून एका मोठ्या फरकाने मात देणे गरजेचे आहे. सर्वात आधी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेणं महत्त्वाचं होतं ते मुंबईने केलं आहे. आता नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम करत जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत. धावांचं शिखर कसं बनवता येईल हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर सनरायजर्स हैद्राबादला कमीत कमी 171 धावांच्या फरकानेच पराभूत करावं लागेल तेव्हाच ते केकेआऱला नेट रनरेटच्या शर्यतीत मागे टाकून प्लेऑफमध्ये पोहोचू शकतील. दरम्यान या दिशेने प्रयत्न करताना इशानने सुरुवात तर उत्तम करुन दिली आहे. त्याने अर्धशतक तर ठोकलं आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील मुंबईत्या खेळाडूकडून ठोकण्यात आलेलं हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. याआधी पोलार्डच्या नावावर 17 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा रेकॉर्ड होता.
इशान किशन विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद (16 चेंडू)
कायरन पोलार्ड विरुद्ध केकेआर (17 चेंडू)
इशान किशन विरुद्ध केकेआर (17 चेंडू)
हार्दीक पंड्या विरुद्ध केकेआर (17 चेंडू)
कायरन पोलार्ड विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (17 चेंडू)
अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावलेल्या इशानने उत्कृष्ट खेळीचे दर्शन घडवले. त्याची फलंदाजी पाहता तो नक्कीच शतक झळकावेल असे वाटत होते. पण 84 धावांवर असताना युवा गोलंदाज उम्रान मलिकने त्याची विकेट घेतली. यष्टीरक्षत साहाने त्याचा झेल घेतला. दरम्यान इशानने 32 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकार ठोकत 84 धावा केल्या. केवळ 16 धावांनी त्याच शतक हुकलं.
Match 55. 9.1: WICKET! I Kishan (84) is out, c Wriddhiman Saha b Umran Malik, 124/3 https://t.co/iubCBQGjOQ #SRHvMI #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) October 8, 2021
हे ही वाचा
RCB vs DC Live Score, IPL 2021: विराटसेनेची टक्कर पंतच्या दिल्लीशी, नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी
T20 World Cup 2021 च्या दृष्टीने टीम इंडियाची मोठी घोषणा, 13 ऑक्टोबरला अवतरणार नव्या रुपात
(Mumbai Indian Opener Ishan Kishan Smashes Fastest 50 in IPL history in just 16 balls in SRH vs MI match)