मुंबई: IPL 2022 मधील सुमार कामगिरीनंतर Mumbai Indians ने आतापासूनच पुढच्या आयपीएल सीजनची तयारी सुरु केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु न करणाऱ्या भारतीय खेळाडूंना फ्रेंचायजी तीन महिन्याच्या इंग्लंड दौऱ्यावर घेऊन जाणार आहेत. मुंबई इंडियन्सच्या टीम मधील खेळाडूंना टॉप काऊंटी क्लब विरोधात कमीत कमी 10 सामने खेळण्याचा अनुभव मिळणार आहे. एनटी तिलक वर्मा, (Tilak Varma) कुमार कार्तिकेय, रमणदीप सिंह आणि ऋतिक शौकीन या मुंबई इंडियन्सच्या युवा खेळाडूंना इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्याचा अनुभव मिळणार आहे. आयपीएल मधील एका सूत्राने पीटीआयला ही माहिती दिली. इंग्लंडमध्येच असलेला अर्जुन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेव्हिसही या अभ्यास दौऱ्यासाठी संघात दाखल होतील, अशी माहिती आहे.
मुंबई इंडियन्सचे कोच माहेला जयवर्धने आणि अन्य सपोर्ट स्टाफही इंग्लंडमध्ये यावेळी उपस्थित असेल. त्यांच्या देखरेखीखालीच हे खेळाडू तिथे क्रिकेट सामने खेळतील. भारतात देशांतर्गत क्रिकेटच सत्र संपलं आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह हे सीनियर खेळाडू राष्ट्रीय संघासोबत आहेत. मुंबई इंडियन्समधील अन्य आंतरराष्ट्रीय खेळाडू आपआपल्या देशाच्या संघासोबत आहेत.
तिलक वर्मा, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, मयंक मार्कंडेय, राहुल बुद्धि, रमणदीप सिंह, अनमोलप्रीत सिंह, बासिल थम्पी, मुरुगन अश्विन, आर्यन जुयाल, आकाश मेधवाल, अर्शद खान, अर्जुन तेंडुलकर आणि डेवाल्ड ब्रेव्हिस,
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने खूपच खराब प्रदर्शन केलं. गुण तालिकेत हा संघ तळाला होता, 14 पैकी फक्त त्यांना फक्त चारच सामने जिंकता आले. मुंबईच्या संघात अनेक युवा खेळाडू आहेत. त्यांना आकार देण्यासाठी इंग्लंडमध्ये ट्रेनिंग देण्याचा प्लान बनवला आहे.