मुंबई : IPL 2023 मध्ये विराट कोहलीचा फॉर्म कोणापासून लपून राहिलेला नाहीय. त्याने चालू सीजनमध्ये चांगली बॅटिंग केलीय. आतापर्यंत विराटने 6 हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. विराटचा परफॉर्मन्स चांगला आहे. पण, 20 लाख रुपये प्राइस असलेल्या एका भारतीय खेळाडूने विराटला मागे टाकलय. या खेळाडून कोहलीपेक्षा कमी धावा केल्या आहेत, मात्र तरीही त्याने विराटला एकाबाबतीत मागे टाकलय.
मुंबई इंडियन्सकडून आयपीएल 2023 मध्ये तिलक वर्मा घातक फलंदाजी करतोय. त्याने आपल्या खेळाने प्रभावित केलय. मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसला आपल्या स्क्वाडमध्ये त्याचा समावेश केला होता. महत्वाच म्हणजे त्याच वय सुद्धा 20 वर्ष आहे.
कशामध्ये त्याने विराटला मागे टाकलं?
चालू आयपीएल सीजनमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या प्लेयर्समध्ये विराट 6 व्या नंबरवर आहे. त्याने विराटला स्ट्राइक रेटच्या बाबातीत मागे टाकलं आहे. चालू सीजनमधध्ये तिलकचा स्ट्राइक रेट 153.38 आहे. तेच कोहलीचा स्ट्राइक रेट 131.53 आहे.
कसं आहे तिलकच प्रदर्शन?
तिलक वर्माने चालू आयपीएल सीजनमध्ये आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यात त्याने 45.67 ची सरासरी आणि 158.38 च्या स्ट्राइक रेटने 274 धावा केल्या आहेत. मागचे काही सामने दुखापतीमुळे तिलक खेळू शकलेला नाही. या दरम्यान त्याने एक हाफ सेंच्युरी सुद्धा झळकवली आहे. नाबाद 84 हा त्याचा सर्वाधिक स्कोर आहे.
कसं आहे कोहलीच आतापर्यंतच प्रदर्शन?
आरसीबीकडून कॅप्टन फाफ डु प्लेसीने आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. कोहलीने आतापर्यंत 12 सामन्यात 39.82 च्या सरासरीने 131.53 च्या स्ट्राइक रेटने 438 धावा केल्या आहेत. त्याने 6 हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. नाबाद 82 ही विराटची सर्वाधिक धावसंख्या आहे. टुर्नामेंटच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्स विरुद्ध विराटने 82 धावांची खेळी केली होती.