IPL 2021: मंगळवारी (5 ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (RR vs MI) या दोन संघामध्ये आय़पीएलचा 51 वा सामना पार पडला. सामन्यात मुंबईने दमदार असा विजय राजस्थान संघावर मिळवला. दरम्यान या विजयात आधी मुंबईच्या गोलंदाजानी उत्कृष्ट गोलंदाजी करत राजस्थानला अवघ्या 90 धावांवर रोखलं. ज्यानंतर 91 धावाचं सोपं लक्ष्यही केवळ 8.2 षटकात पूर्ण केलं. दरम्यान हे लक्ष्य गाठण्यात महत्त्वाची खेळी मुंबईचा युवा फलंदाज इशान किशनने (Ishan Kishan) केली. त्याने धडाकेबाद अर्धशतक ठोकलं. दरम्यान अर्धशतक ठोकण्याची कमाल करणारा इशान क्रिकेटसह बास्केबॉलमध्येही तरबेज असल्याचं एका व्हि़डीओतून समोर आलं आहे.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये इशान उत्तम अशा बास्केटबॉल स्किल्स दाखवत आहे. तो अगदी अप्रतिम रित्या बॉलला बास्केटमध्ये टाकत असून हा व्हिडीओही उत्तम पद्धतीने शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस नेटकरी पाडत आहेत. तर तुम्हीही हा व्हिडीओ पाहाच…
91 धावांचं सोपं लक्ष्य पार करताना मुंबईचा सलामीवीर कर्णधार रोहितने चांगली सुरुवात केली. पण 22 धावा होताच चेतन सकारियाने त्याला बाद केलं. त्यानंतर सूर्यकुमारही 13 धावा करुन बाद झाला. मुस्तफिजूरने त्याची विकेट घेतली. पण सलामीवीर इशान किशन मात्र एका बाजूने तुफानी फलंदाजी करतच होता. त्याने अवघ्या 25 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकत 50 धावा केल्या आणि सोबतच मुंबईला अवघ्या 8.2 ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला.
सध्या केकेआर आणि मुंबई दोघांनी 13 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत. पण केकेआरचा नेट रनरेट +0.294 असून मुंबईचा -0.048 इतका आहे. त्यामुळे केकेआर चौथ्या आणि मुंबई पाचव्या स्थानावर आहे. यामुळेच दोन्ही संघाचा अखेरचा सामना अत्यंत महत्त्वाचा असून केकेआरचा सामना गुरुवारी राजस्थान रॉयल्ससोबत तर मुंबईचा शुक्रवारी सनरायजर्स हैद्राबादसोबत होणार आहे.
हे ही वाचा
(Mumbai Indians cricketer Ishan Kishan basket ball skills video on instagram)