Mumbai Indians : भारत आणि इंग्लंड ( Ind vs Eng ) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी शुक्रवारी रात्री टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. मुंबई इंडियन्सने संघाचे पोस्टर शेअर करुन नवा वाद ओढवून घेतला आहे. हे पोस्टर पाहून मुंबई इंडियन्सचे चाहते चांगलेच संतापले आहेत.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर भारतीय संघाचे एक पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये इंग्लंडविरुद्ध खेळणारा संघ दाखवण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह दिसत आहे, पण रोहित शर्मा पोस्टरमधून गायब होता.
हा पोस्टर शेअर केल्याबद्दल चाहत्यांमध्ये नाराजी आहे. मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांच्यात सर्व काही सुरळीत चालले नसल्याचा अंदाज चाहत्यांनी वर्तवला आहे. मीम्स शेअर करत रोहितच्या चाहत्यांनी लिहिले की कुछ तो गडबड है दया. तसेच चाहत्यांनी एमआय पेज अनफॉलो करण्याचे आवाहन केले आहे.
🔒𝐈𝐍
Your thoughts on the squad, paltan? 🤔#OneFamily #INDvENG pic.twitter.com/lGreG3DeMU
— Mumbai Indians (@mipaltan) January 13, 2024
आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी एमआयने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवले आहे. एमआयने रोहितच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने मुंबई इंडियन्सचे चाहते चांगलेच संतापले होते. हार्दिकला मुंबईने रिटेन करत मुंबई इंडियन्सचा कर्णधार केल्याने चाहत्यांनीही आक्षेप घेतला होता.
रोहित शर्मा (क), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मुकेश कुमार, आवेश खान