9 वर्षानंतर आईला भेटला भारतीय क्रिकेटपटू, रोहित शर्माने दिली होती संधी

| Updated on: Aug 03, 2022 | 2:05 PM

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईचं एक वेगळं स्थान असतं. कारण आई आपल्याला घडवते. आईशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाही करु शकत नाही.

9 वर्षानंतर आईला भेटला भारतीय क्रिकेटपटू, रोहित शर्माने दिली होती संधी
mumbsi-indians
Follow us on

मुंबई: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईचं एक वेगळं स्थान असतं. कारण आई आपल्याला घडवते. आईशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाही करु शकत नाही. 9 वर्ष 3 महिने 3375 दिवसानंतर तुम्ही तुमच्या आईला भेटलात, तर तो क्षण शब्दात व्यक्त करणं सोप नाहीय. त्यावेळी होणारा आनंद शब्दात मांडता येणार नाही. भारतीय क्रिकेटपटू कार्तिकेय सिंहसाठी सुद्धा हा क्षण शब्दात मांडण अशक्य आहे. तो 9 वर्ष 3 महिन्यानंतर आई आणि कुटुंबाला भेटला. त्याने तो क्षण कॅमेऱ्यात कैद केला, पण ती जाणीव सांगता येणार नाही.

मुंबई इंडियन्सकडून केला होता डेब्यू

एक जिद्द म्हणून कार्तिकेयने आपलं घर सोडलं होतं. सोशल मीडियावर आई सोबतचा फोटो शेयर करताना, आपल्या भावना मांडू शकत नाही, असं त्याने लिहिलं आहे. कार्तिकेयने आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सकडून डेब्यु केला होता. कार्तिकेयने आपल स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर सोडलं होतं. काहीतरी बनल्यानंतरच घरी परत येईन, असं त्याने ठरवलं होतं. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने त्याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राइस मध्ये विकत घेतलं. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यातून त्याने आयपीएल मध्ये डेब्यु केला. पहिल्याच सामन्यात त्याने छाप उमटवली. कार्तिकेयने राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनला माघारी धाडलं होतं.

कुटुंबाची Reaction पहायची होती

मुंबईने आयपीएल दरम्यान त्याचा एक व्हिडियो शेयर केला होता. त्यात काहीतरी बनल्यानंतरच घरी परतेन, असं कार्तिकेय म्हणाला होता. मुंबई इंडियन्सने त्याला खूप सपोर्ट केला. जेव्हा त्याला गोलंदाजीची संधी मिळाली, तेव्हा कॅप्टन रोहित शर्माने बिनधास्त गोलंदाजी कर, बाकी सगळं मी पाहून घेईन, असं म्हटलं होतं. कार्तिकेयने सांगितलं की, त्याच्या वडिलांनी संपूर्ण बटालियन सोबत बसून सामना पाहिला होता. 9 वर्षांनी घरी जाईन, तेव्हा मला कुटुंबाची Reaction पहायची आहे, असं सुद्धा कार्तिकेय त्या व्हिडिओ मध्ये म्हणाला होता.