Ishan Kishan | टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु असताना अचानक एक घटना घडली होती. विकेटकीपर फलंदाज इशान किशन अचानक दौऱ्यावरुन माघारी परतला होता. तेव्हापासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. टीम मॅनेजमेंट आणि इशान किशनमध्ये काहीतरी बिनसल्याचे संकेत मिळत आहेत. राहुल द्रविड यांनी इशान किशनला रणजी स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला होता. पण इशानने तो सल्ला ऐकला नाही. दुबईतील त्याच्या पार्टीचा फोटो समोर आला होता. या सगळ्या घडामोडी दरम्यान इशान किशनबद्दल एक बाब समोर आलीय.
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, इशान किशन सध्या बडोदा येथे हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पंड्यासोबत प्रॅक्टिस करत आहे. आयपीएलचा सीजन सुरु होण्याआधी इशान किशन मैदानावर घाम गाळतोय. त्याने या बद्दल कोणाला काही माहिती दिलेली नाही.
द्रविड इशानबद्दल काय म्हणाले?
टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी इशान किशनला देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळाव लागेल असं राहुल द्रविड म्हणाले होते. पण इशानने द्रविड यांचा सल्ला ऐकला नाही. तो रणजी ट्रॉफीच्या सामन्यात दिसला नव्हता. राज्य क्रिकेट बोर्डाने विचारणा केल्यानंतरही इशान खेळला नाही. इशान किशनवर पुनरागमन अवलंबून आहे, असं द्रविड म्हणाले होते. वारंवार इशान किशनच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं.
नोव्हेंबरपासून एकही सामना नाही
क्रिकबजच्या रिपोर्ट्नुसार बडोद्याच्या किरण मोरे अकादमीमध्ये इशान किशन प्रॅक्टिस करतोय. पंड्या ब्रदर्ससोबत मिळून आयपीएलची तयारी करतोय. इशान किशन मागच्या नोव्हेंबरपासून एकही सामना खेळलेला नाहीय. वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या सामन्यात तो खेळला, त्यानंतर तो टीममध्ये खेळू शकला नाही.
सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठल्या कॅटेगरीत?
इशान किशनने वारंवार रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास नकार दिला. आता प्रश्न हा उपस्थित होतोय की, बीसीसीआय त्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवणार की, नाही ठेवणार. कारण मागच्या दोन-तीन सीरीजपासून तो टीमचा भाग नाहीय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत नाहीय. टीम इंडियासच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये सी-कॅटेगरीत आहे.