दुबई : कोरोनाच्या संकटामुळे उर्वरीत आयपीएल (IPL 2021) ही युएई (UAE) होणार आहे. 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलसाठी सर्व संघ युएईला पोहोचले आहेत. चेन्नई सुपरकिंग्सनंतर (CSK) सर्वात आधी मुंबई इंडियन्सचा संघ युएईला पोहोचला होता. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपताच कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) युएईला पोहोचला आहे. आता सर्व खेळाडूंचा विलगीकरणाचा कालावधी संपला असून सर्व संघांने सरावाला सुरुवात केली आहे.
नुकताच मुंबई इंडियन्सने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये संघाचे सर्व खेळाडू जीममध्ये सराव करताना दिसत आहेत. यामध्ये इशान किशन, राहुल चहर, धवल कुलकर्णी, जयंत यादवसह पियुष चावला हे सारे दिसत आहे. पण यामध्ये युवा खेळाडू आणि सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून मात्र उठून दिसत आहे. 6 फुटांच्या आसपास उंच असणाऱ्या अर्जूनचा फिटनेस पाहून मुंबईचे चाहते प्रभावित झाले आहेत. या व्हिडीओला मागे बेजुबान हे धांसू गाणंही लावलं आहे.
सर्वात यशस्वी आयपीएल संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्सने यंदाही स्पर्धा जिंकण्याच्या दृष्टीने सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने आतावपर्यंत झालेल्या आयपीएलमधील 29 सामन्यांपैकी 7 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 4 सामने जिंकले आहेत. पण हे चारही सामने अत्यंत दमदार पद्धतीने जिंकल्याने यंदाही आयपीएल ट्रॉफीचे प्रबळ दावेदार म्हणून मुंबई इंडियन्स संघाकडे पाहिलं जात आहे.
इतर बातम्या
IPL 2021 सुरु होण्यापूर्वी पोलार्डचा जलवा, 22 चेंडूत संपवला 20 षटकांचा सामना, 232 चा स्ट्राईक रेट
IPL 2021 च्या पहिल्या पर्वात कोणी जिंकले किती सामने? पाहा एका क्लिकवर
तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद
(Mumbai indians players in gym video posted by MI see arjun tendulkar fitness)