मुंबई : सलग काही सामन्यातील फ्लॉप शो नंतर मुंबई इंडियन्सचा स्फोटक बॅट्समन सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये आलाय. आज मुंबई इंडियन्ससमोर गुजरात टायटन्सचा कठीण पेपर आहे. मागच्यावेळी सूर्या फेल झाला होता. यावेळी गुजरात विरुद्ध सूर्याची बॅट तळपली नाही, तर मुंबईच्या अडचणी वाढतील. इतकच नाही, मुंबईच्या प्लेऑफच्या स्वप्नाला सुद्धा झटका बसू शकतो. गुजरात टायटन्सची टीम आधीपासून पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर आहे. त्यामुळे मुंबईला विजयासाठी पराकाष्ठा करावी लागेल.
मुंबईकडे रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमरुन ग्रीनसारखे फलंदाज आहेत. गुजरातच्या टीमकडे मोहम्मद शमी आणि राशिद खान हे बॉलर्स आहेत. शमी आणि राशिद खान दोघांनी मिळून आतापर्यंत प्रत्येकी 19-19 विकेट घेतलेत. या दोन बॉलर्ससाठी मुंबईने खास रणनिती बनवली असेल. पण 10 मॅचमध्ये 361 धावा करणाऱ्या सूर्याला सर्वात जास्त धोका 30 लाखाच्या एका बॉलरपासून आहे. त्याने आतापर्यंत 33.75 कोटी रुपये किंमत असलेल्या फलंदाजांना चितपट केलं आहे.
सूर्याला गुजरातच्या कुठल्या बॉलरपासून धोका?
सूर्यासाठी राशिद खानचा चेला नूर अहमद अडचणी वाढवू शकतो. मागच्या सामन्यात सूर्याच नूर अहमदसमोर काही चाललं नव्हतं. गुजरात आणि मुंबईची टीम या सीजनमध्ये शुक्रवारी दुसऱ्यांदा आमने-सामने असणार आहे. पहिल्या लढतीत गुजरातने 55 धावांनी बाजी मारली होती. सूर्या फक्त 23 धावा करु शकला होता. अफगाणि गोलंदाज नूरने आपल्याच गोलंदाजीवर त्याची कॅच घेतली होती. सूर्या त्याच्यासमोर संघर्ष करताना दिसलेला. सूर्याने नूरच्या बॉलिंगवर फक्त एक बाऊंड्री मारु शकला होता.
33.75 कोटी किंमतीच्या बॅट्समनच्या काढल्या विकेट
नूर अहमदने 7 मॅचेसमध्ये 11 विकेट घेतल्यात. तो कमालीची गोलंदाजी करतोय. गुजरातने मागच्यावर्षी मेगा ऑक्शनमध्ये 30 लाख रुपयाच्या बेस प्राइसला त्याला विकत घेतलं होतं. 30 लाखाच्या या बॉलरने मुंबईच्या 33.75 कोटी रुपयाच्या फलंदाजांना चितपट केलं होतं. मागच्या लढतीत नूरने 37 धावात 3 विकेट घेतले होते. 8 कोटी रुपये प्राइस असलेल्या सूर्याशिवाय 8.25 कोटी किंमत असलेला टिम डेविड आणि 17.50 कोटी किंमत असलेल्या कॅमरुन ग्रीनला आऊट केलं होतं.
नूर अहमदचा गुरु कोण?
नूर अहमदचा गुरु राशिद खान आहे. राशिद स्टार बनला, त्यावेळी त्याने अफगाणिस्तानातील अनेक युवकांना प्रेरणा दिली. यापैकी नूर अहमद एक आहे. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने राशिदचा मार्ग पकडला. राशिदला पाहून त्याने आपल्या बॉलिंगमध्ये सुधारणा केली. नूर अहमद राशिदला सतत प्रश्न विचारत असतो. दोघे जेवणाच्या टेबलावर एकत्र असतातना सुद्धा नूर त्याला प्रश्न विचारत असतो. राशिदकडून मी मैदानावर आणि मैदानाबाह्रेर बरच काही शिकलोय, असं नूर अहमद म्हणाला.