मुंबई : मुंबई इंडियन्सचा आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामना होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता या मॅचला सुरुवात होईल. आयपीएलमधील ही 42 वी मॅच आहे. संजू सॅमसनच्या राजस्थानने मागच्या सामन्यात एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमीलाचा उंचावला आहे. तेच मुंबई इंडियन्सचा मागच्या दोन सामन्यात पराभव झालाय.
मुंबई इंडियन्सला मागच्या सामन्यात गुजरात टायटन्स त्याआधी पंजाब किंग्सने पराभूत केलं. मुंबईच्या कामगिरीत सातत्य नाहीय. प्लेऑफची आशा जिंवत ठेवण्यासाठी यापुढच्या सर्व सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय आवश्यक आहे.
पॉइंट्स टेबलची स्थिती काय?
पॉइंट्स टेबलमध्ये पाच विजयासह राजस्थान रॉयल्सची टीम दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानचे 10 पॉइंट्स आहेत. दुसऱ्याबाजूला मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून दुसऱ्या नंबरवर आहे. सात सामन्यात मुंबईने फक्त तीन विजय मिळवलेत.
जोफ्रा आर्चर खेळणार ?
आजच्या सामन्यात जोफ्रा आर्चर सिलेक्शनसाठी उपलब्ध असेल. तो कोपराच्या दुखापती संदर्भात सल्ला घेण्यासाठी बेल्जियमला गेला होता. जोफ्रा आर्चर आज प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला, तर तो रिले मेरेडिथची जागा घेईल.
अर्जुन तेंडुलकरच्या समावेशाबद्दल साशंकता का ?
आजच्या सामन्यासाठी अर्जुन तेंडुलकर टीममधील आपलं स्थान कायम टिकवून ठेवेल. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल. चार सामन्यात अर्जुन तेंडुलकरने 9.35 च्या सरासरीने तीन विकेट घेतल्या आहेत. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला मार पडला होता. त्यामुळे गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात अर्जुनला पूर्ण चार ओव्हर्स दिल्या नव्हत्या. त्यामुळे कोट्यातील पूर्ण ओव्हर्स मिळणार नसतील, तर अर्जुन तेंडुलकरला खेळवणार का? हा मुद्दा उपस्थित केला जात होता.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कर्णधार), अब्दुल बसिथ, मुरुगन अश्विन, रविचंद्रन अश्विन, केएम आसिफ, ट्रेंट बोल्ट, जोस बटलर, केसी करियप्पा, युजवेंद्र चहल, डोनोवन फरेरा, शिमरोन हेटमेयर, जेसन होल्डर, यशस्वी जायसवाल, ध्रुव जुरेल, ओबेड मॅककॉय , देवदत्त पडिक्कल, रियान पराग, कुणाल सिंह राठोड, जो रूट, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव आणि एडम जम्पा.