मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या आधीच अडचणींचा सामना करतोय. मुंबईच्या टीमची सूत्र हाती घेतल्यापासून त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. त्यात यंदाच्या सीजनची टीमसाठी सुरुवात चांगली झालेली नाही. मुंबई इंडियन्सने तिन्ही सामने गमावून पराभवाची हॅट्ट्रिक केली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध एकमेव विजय मिळवला. पाच सीजन आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या या स्थितीसाठी हार्दिक पांड्याला जबाबदार धरल जातय. त्यातच व्यक्तीगत आघाडीवर हार्दिक पांड्यासाठी एक वाईट बातमी आहे. हार्दिक पांड्याच्या मोठ्या चुलत भावाला फसवणूक प्रकरणात अटक झाली आहे. हार्दिक आणि क्रृणाल पांड्याला फसवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 4.3 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. हार्दिक आणि क्रृणालची फसवणूक केल्याप्रकरणी वैभव पांड्याला अटक करण्यात आलीय.
हार्दिक पांड्या, क्रृणाल पांड्या आणि वैभव पांड्या तिघांनी मिळून एक कंपनी स्थापन केली होती. हार्दिक आणि क्रृणाला दोघांचे त्या कंपनीत 40 टक्के शेअर होते. वैभवचे 20 टक्के शेअर होते. आता वैभव पांड्याला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. 2021 मध्ये तिघांनी मिळून पॉलिमरचा व्यवसाय सुरु केला. वैभवने नंतर स्वत:चाच पॉलिमरचा व्यवसाय सुरु केला. त्याने हार्दिक आणि क्रृणालला या बद्दल काही कळवलं नाही. पैशांच्या अफरातफरीसह नियमांच उल्लंघन केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. इनसाइड स्पोर्ट्सने हे वृत्त दिलय.
जसं ठरवलय तशा गोष्टी घडत नाहीयत
IPL 2024 चा सीजन सुरु होण्याआधी हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये परतला. सध्या तो मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे. रोहित शर्माला हटवून त्याच्याजागी हार्दिकला कॅप्टन बनवण्यात आलं. पण मुंबईसाठी अजून जसं ठरवलय तशा गोष्टी घडत नाहीयत. पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सची खराब सुरुवात झाली आहे. पहिले तिन्ही सामने मुंबईच्या टीमने गमावले आहेत.