मुंबई: एकवेळ भारताच्या कसोटी संघाचा (Test Team) महत्त्वाचा भाग राहिलेला सलामीवीर मुरली विजयने (Murli Vijay) दोन वर्षानंतर मैदानावर पुनरागमन केलं. त्याने तामिळनाडू प्रीमियर लीगमधून मैदानात पुनरागमन केलय. TNPL मध्ये शुक्रवारी डिंडिगुल ड्रॅगर्स आणि रुबी त्रिची वॉरियर्स मध्ये सामना झाला. या लीगमध्ये मुरली विजय रुबी त्रिची वॉरियर्ससाठी खेळतोय. विजयकडून पहिल्या सामन्यात अपेक्षित कामगिरी झाली नाही. तो फ्लॉप ठरला. व्यक्तीगत कारणांमुळे मुरली विजयने क्रिकेटपासून ब्रेक घेतला होता. पुनरागमनाच्या सामन्यात त्याने खूप कमी धावा केल्या. तो फक्त 8 धावा करुन आऊट झाला. तो एकही चौकार मारु शकला नाही. दोन वर्षानंतर मुरली विजयच पुनरागमन दमदार होऊ शकलं नाही. या लीग मध्ये पुढच्या सामन्यात त्याच्याकडून चांगली कामगिरी होईल, अशी अपेक्षा आहे.
मुरली विजयने या सामन्याआधी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएल 2020 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. त्यावेळी तो महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. त्या सीजनमध्ये तो तीन आय़पीएल सामने खेळला होता. विजय बऱ्याचकाळापासून टीम इंडियात स्थान मिळवू शकलेला नाही. तो भारतासाठी पर्थ येथे 2018 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
विजय फलंदाजीमध्ये अपयशी ठरला असेल, पण त्याचा त्रिची वॉरियर्स संघ जिंकला. निद्धिश राजगोपालने या टीमसाठी अर्धशतक फटकावलं. त्यामुळे संघाला विजय मिळवता आला. त्याशिवाय आदित्य गणेशने 37 धावा केल्या. 145 धावांचा पाठलाग करणाऱ्या त्रिची वॉरियर्सने अमित सात्विकचा विकेट लवकर गमावला होता. त्याने 15 चेंडूत 28 धावा केल्या. आपल्या डावात त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला. त्यानंतर विजय आऊट झाला. हे दोघे बाद झाल्यानंतर त्रिची वॉरियर्स संघाला झटका लागला नाही. राजगोपाल आणि गणेशने तिसऱ्याविकेसाठी 114 धावांची भागीदारी केली. राजगोपालने 48 चेंडूंचा सामना करताना, सहा चौकार आणि एक षटकार लगावला. त्याने नाबाद 64 धावा केल्या.