आयपीएल 2025 स्पर्धेला सुरुवातीचा टप्प्यात फार काही घडलं नसलं तरी हळूहळू रंगत चढत चालली आहे. दुसरीकडे, मजेदार गोष्टीही मैदानात घडत आहेत. यशस्वी जयस्वाल आणि मुशीर खान असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यशस्वी जयस्वालने सामना संपल्यानंतर मुशीर खानकडे खास विनंती केली. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची नक्कल करण्यास सांगितलं. मुशीरने त्याच्या विनंतीला मान ठेवून लगेचच श्रेयस अय्यरची नक्कल केली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जयस्वालच्या विनंतीनुसार मुशीरने अय्यरच्या चालण्याचे अतिशय गोंडसपणे अनुकरण केले. सामन्यानंतर पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सचे खेळाडू एकत्र उभे होते. तेव्हा यशस्वी जयस्वालने विनंती केली आणि सांगितलं की, ‘कर ना एक एक्टिंग थोडी कर..भाई, एकदा तर लाईव्ह पाहू दे ना..’ यशस्वी जयस्वालने असं सांगितल्यानंतर मुशीर खानने त्याच्या विनंतीला मान दिला आणि दोन तीन पावलं चालला.
मुशीर खानने दोन तीन पावलात केलेल्या हालचालीवरून श्रेयस अय्यरच्या चालण्याची ढब अधोरेखित झाली. श्रेयस अय्यर अगदी असाच चालतो, असं अनेकांनी कमेंट्स करत सांगितलं. त्याच्या या शैलीमुळे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने दाद दिली. यशस्वी जयस्वालनेही टाळी देत एकमद परफेक्ट केलं असं सागितलं. अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं की, आयपीएल स्पर्धेदरम्यान थोडा ताण कमी करण्यासाठी केलेला विरुंगळा बघताना बरं वाटलं. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं की, इतकी जबरदस्त नक्कल करतो की त्याला आता बॉलिवूडमध्ये काम करायला हवं.
Musheer Khan imitating Shreyas Iyer after Jaiswal’s request. 🤣pic.twitter.com/LVQuEJ2623
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 7, 2025
पंजाब किंग्सने मेगा लिलावात मुशीर खानला 30 लाखांच्या बेस प्राईसवर संघात समाविष्ट केलं आहे. पण मुशीर खानला आतापर्यंत प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. पंजाब किंग्सने या स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे. आतापर्यंत तीन सामने खेळले असून दोन सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपवलं आहे. पंजाब किंग्सने 26.75 कोटी रुपये खर्च करून संघात घेतलं आहे. आयपीएलमधील दुसरा महागडा खेळाडू आहे.