रावळपिंडी: पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या इंग्लंडने पाकिस्तानी गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. पहिली टेस्ट कसोटी कमी आणि टी 20 सामना जास्त वाटतोय. कारण इंग्लंडच्या बॅट्समननी बॅटिंगची तशी केली. आज दुसऱ्यादिवसाची सुरुवात देखील तशीच झाली होती. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहला पहिल्याच चेंडूवर सिक्स मारला. काल पहिल्या दिवशीच इंग्लंडच्या टीमने चार बाद 506 धावा केल्या होत्या. 145 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात जे घडलं नाही, ते काल इंग्लंडच्या टीमने करुन दाखवलं.
त्याच ओव्हरमध्ये कमबॅक
आज पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात षटकाराने झाली. स्टोक्सने नसीम शाहला सिक्स मारला. पण पाकिस्तानच्या या प्रतिभावान गोलंदाजाने त्याचा ओव्हरमध्ये कमबॅकही केलं. सिक्स मारल्यानंतर दुसऱ्या बॉलवर स्टोक्सने एकेरी धाव घेतली. पण त्यानंतर पुढच्याच चेंडूवर हॅरी ब्रूकने सिंगल धाव काढली. पुन्हा स्टोक्स स्ट्राइकवर आला.
स्लोअरवनचा उपयोग
स्टोक्स पुन्हा हल्लाबोल करणार, हे नसीम शाहला ठाऊक होतं. बेन स्टोक्स T20 क्रिकेटच्या मूडमध्ये होता. स्टोक्सने गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. पण नसीमने चेंडूला जास्त वेग दिला नाही. त्याने स्लोअरवन टाकला. स्टोक्सने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूने थेट स्टम्पसचा वेध घेतला.
First over of the day and @iNaseemShah dismisses the England captain ?#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/TYsrV8oG6p
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 2, 2022
नसीम शाहच्या 3 विकेट
18 चेंडूत 41 धावांवर बाद होऊन स्टोक्सने पॅव्हेलियनची वाट पकडली. त्याने 6 चौकार आणि 2 षटकार लगावले. नसीम शाहने त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि हॅरी ब्रूकचा विकेट काढला. त्याने 24 ओव्हर्समध्ये 140 धावा देऊन 3 विकेट काढल्या.