Naseem Shah चा ODI मध्ये धडाका, असा वर्ल्ड रेकॉर्ड करुन सर्वांनाच केलं थक्क

| Updated on: Jan 12, 2023 | 12:49 PM

19 वर्षाचा नसीम शाह ODI क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करतोय. असा कमालीचा वर्ल्ड रेकॉर्ड करुन सर्वांनाच हैराण करुन सोडलय.

Naseem Shah चा ODI मध्ये धडाका, असा वर्ल्ड रेकॉर्ड करुन सर्वांनाच केलं थक्क
Naseem shah
Image Credit source: Twitter
Follow us on

Naseem Shah World Record: पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहने क्रिकेट विश्वाला हैराण करुन सोडणारी कामगिरी केलीय. 19 वर्षाच्या या युवा बॉलरने आपल्या करिअरच्या 5 व्या मॅचमध्येच ही करामत केलीय. Naseem Shah ने वनडे करिअरच्या सुरुवातीच्या 5 सामन्यात 18 विकेट घेतले. नसीम शाह करिअरच्या पहिल्या पाच सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनलाय. त्याने ही कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाच्या रियान हॅरिसचा रेकॉर्ड मोडला. त्याने वनडे करिअरच्या सुरुवातीच्या 5 सामन्यात 17 विकेट घेतले होते.

आणखी कुठल्या बॉलर्सनी अशी कामगिरी केलीय?

त्यानंतर वेस्ट इंडिजचा माजी गोलंदाज गॅरी गिल्मरचा नंबर येतो. त्याने वनडे करिअरच्या सुरुवातीच्या 5 सामन्यात 16 विकेट काढल्या होत्या. बांग्लादेशच्या मुस्तफिजुर रहमानने वनडे करिअरच्या सुरुवातीच्या 5 सामन्यात 16 विकेट घेण्याची करामत केली होती.


कुठला गोलंदाज रेकॉर्ड मोडणार?

19 वर्षाच्या नसीम शाहने वनडेमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय. आता त्याचा हा रेकॉर्ड कुठला गोलंदाज मोडतो? त्याची उत्सुक्ता आहे. त्याशिवाय त्याच्या वनडे करिअरच आणखी एक वैशिष्ट्य आहे. नसीन शाहने त्याच्या पहिल्या 5 वनडे सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये फलंदाजांना बाद केलय.

पाकिस्तान वि न्यूझीलंड दुसरी वनडे कोणी जिंकली?

न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये वनडे सीरीजमधला दुसरा सामना झाला. या मॅचमध्ये न्यूझीलंडने पाकिस्तानला 79 धावांनी हरवलं. आता मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. न्यूझीलंडने पहिली बॅटिंग करताना 261 धावा केल्या. डेवॉन कॉन्वेने शानदार 101 धावा केल्या. पाकिस्तानकडून फक्त बाबर आजमने सर्वाधिक 79 धावा केल्या. पाकिस्तानची पूर्ण टीम 182 रन्सवर ऑलआऊट झाली.