अहमदाबाद : दक्षिण आफ्रिकेचा ओपनर क्विंटन डि कॉकची आयपीएल 2023 मध्ये पहिली मॅच खेळण्याची प्रतिक्षा रविवारी संपणार आहे. तो गुजरात टायटन्स विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये या सीजनचा पहिला सामना खेळतोय. डि कॉक इन झाल्यामुळे नवीन उल हकला प्लेइंग 11 मधून आपलं स्थान गमावाव लागलं आहे. लखनौचा नियमित कॅप्टन केएल राहुल दुखापतीमुळे या सीजनमध्ये खेळणार नाहीय. त्याच्याजागी डिकॉक ओपनिंगला येईल.
डिकॉक मागच्या सीजनमध्ये टीममध्ये होता. तो प्रत्येक सामना खेळला. त्याच्या बॅटिंगच्या बळावर लखनौची टीम प्लेऑफमध्ये पोहोचली होती. मागच्या सीजनमध्ये डिकॉकने 15 मॅचमध्ये 508 रन्स केल्या होत्या. त्याने तीन हाफ सेंच्युरी आणि एक सेंच्युरी झळकवली होती.
विराटशी घेतलेला पंगा
डिकॉकचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केलाय. नवीनला सब्सीट्यिूट सुद्धा ठेवलेलं नाही. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात नवीन उल हकने विराट कोहलीशी पंगा घेतला होता. या मॅचमध्ये विराट आणि नवीनमध्ये बरीच शाब्दीक बाचाबाची झाली होती. मॅचनंतर हात मिळवताना दोघे भिडले होते. लखनौचा मेंटॉर गौतम गंभीरने सुद्धा कोहली बरोबर वाद घातला होता. त्यानंतर बीसीसीआयने तिघांना दंड ठोठावला.
सब्सिटियूट खेळाडूंमध्ये सुद्धा नाव नाही
नवीन उल हकला का बाहेर बसवलं? ते कारण कॅप्टन क्रृणाल पंड्याने सांगितलं नाही. या सीजनमध्ये इम्पॅक्ट प्लेयरचा नियम आहे. पहिली बॅटिंग करणाऱ्या टीम अतिरिक्त फलंदाज घेऊन खेळतात. गोलंदाजीच्यावेळी गोलंदाजाला संधी देतात. यासाठी चार सब्सिटियूट खेळाडूंची निवड केली जाते. पण यावेळी नवीनच नाव या लिस्टमध्ये नाहीय. त्यामुळे नवीन या मॅचमध्ये खेळताना दिसणार नाही. या लिस्टमध्ये डॅनियल सॅम्सच नाव आहे. सब्सिटियूट खेळाडूंमध्ये टीम सॅम्सच्या जागी नवीनला ठेऊ शकत होती. कारण दोघेही परदेशी खेळाडू आहेत.
Kohli did this to Naveen-ul-haq. Said by action that “u r not even equivalent to dirt of my shoes”
The reason why Naveen was so pissed off. pic.twitter.com/lmavQxGyuT
— David. (@CricketFreakD3) May 1, 2023
दोन मॅचनंतर येऊनही डिकॉकला संधी का दिली नाही?
डिकॉक खेळणार हे निश्चित होतं. दोन मॅचनंतर तो लखनौच्या टीममध्ये दाखल झाला होता. तो नॅशनल टीम दक्षिण आफ्रिकेकडून नेदरलँडस विरुद्ध वनडे सीरीज खेळला. लखनौने वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर काइल मेयर्सला टीममध्ये संधी दिली. त्याने शानदार फलंदाजी केली. त्यामुळे मॅनेजमेंटने डिकॉक आल्यानंतरही संधी दिली नाही. टीममध्ये दाखल झाल्यानंतर डिकॉकला आठ मॅच वाट पाहावी लागली.
केएल राहुलला दुखापत झाली. लखनौला त्याच्याजागी चांगला ओपनिंग पार्ट्नर हवा होता. त्यामुळे टीमने डिकॉकला संधी दिली,