राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार-आशिष शेलार यांची भेट होण्याची शक्यता

| Updated on: Oct 10, 2022 | 1:54 PM

राज्यातील दोन मोठे नेते का भेटणार? काय कारण आहे?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार-आशिष शेलार यांची भेट होण्याची शक्यता
sharad pawar-asish shelar
Follow us on

दिनेश दुखंडे, TV9 मराठी मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP) शरद पवार (Sharad pawar) आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार (Asish Shelar) यांची आज भेट होऊ शकते. मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकी संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होऊ शकते. आशिष शेलार मुंबई क्रिकेट असोशिएशनची निवडणूक लढवत आहेत. सध्या त्यांची निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

कधी आहे निवडणूक?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा एमसीए ऑफिसमध्ये येऊ शकतात. मुंबई क्रिकेट असोशिएनच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व घडामोडी घडत आहेत. येत्या 20 ऑक्टोबरला मुंबई क्रिकेट असोशिएशनची निवडणूक पार पडणार आहे.

शरद पवार गटाकडून कोण रिंगणात?

शरद पवार गटाकडून माजी क्रिकेटपटू संदीप पाटील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यंदा एमसीएमध्ये प्रथमच 11 वर्षानंतर राजकारणी विरुद्ध क्रिकेटपटू असा सामना रंगणार आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

शरद पवार गट प्रभावी

एमसीएमध्ये शरद पवार गटाच वर्चस्व आहे. त्यांचा गट प्रभावी मानला जातो. आशिष शेलार यांनी याआधी सुद्धा एमसीएच अध्यक्षपद भूषवलं आहे. पण 2019 मध्य मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे त्यांनी एमसीए अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.